शिवसेनेच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या सन्मान सोहळाला उदंड प्रतिसाद,शिवसेनेच्या वतीने बदनापूर येथे आज झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या सन्मान मेळाव्यात अर्जुन खोतकर यांनी भाजपचे आमदार नारायण कुचे यांचा घेतला समाचार

जालना प्रतीनिधी नरेश अन्ना
बदनापूर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रक्षाबंधन सन्मान सोहळा बदनापूर येथे आज सकाळी 11.30 वाजता शिवसेना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न मेळाव्याला 
मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सन्मान सोहळाला उदंड प्रतिसाद मिळाला असून रक्षाबंधनाचा कार्यक्रम तसेच महिलांचा सत्कार सन्मान केला लाडक्या बहिणींना फेटे बांधत एक आकर्षक वातावरण निर्माण झाले होते तर लाडक्या बहिणीला गिफ्ट स्वरूपात भेटवस्तू देण्यात आले आहे  कार्यक्रम दरम्यान मा.मंत्री अर्जुन खोतकरयांनी 
यावेळी स्थानिक आमदार महायुतीचा धर्म पाळत नाही विविध कार्यक्रमात जाणबुजून मित्र पक्षांना टाळण्याचा प्रयत्न करतात याचा खेद राज्याचे मुख्यमंत्र्यांच्याकडे व्यक्त करणार आसलेल्याच विधान केले तसेच 
बदनापूर मतदार संघ शिवसेनेचा कायम राहिलेला बालेकिल्ला आहे येणाऱ्या विधानसभेला शिवसेनेला जागा सोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार  असलेलेच खोतकर म्हणाले 
शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर व उपदाधिकाऱ्याला डावल जात  असेल तर अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही ज्यांच्या डोक्यात मस्ती असेल ती मस्ती जिरण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे असे ते बोलत होते 

 जिल्हाभरामध्ये मोर्चे बांधणी व कार्यकर्ता मेळावा घेऊन शिवसेनेची ताकद वाढवण्याचे निर्धार जिल्हाध्यक्ष या नात्याने घेतला आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचं हे या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे यांनी प्रतिपादन केले
 यावेळी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा शिवसेनेचे  उपनेते अर्जुन खोतकर तसेच शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भूतेकर, युवा सेनेचे प्रदेश सचिव अभिमन्यू खोतकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सह संपर्कप्रमुख ऍड सुनील किनगावकर,फिरोजलाला तांबोळी, मराठवाडा अल्पसंख्या आघाडी प्रमुख असलमखान पठाण,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल,शिवसेनेची महिला आघाडी संपर्कप्रमुख सविताताई कीवंडे,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख कालिंदाताई ढगे, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहिते,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र लाड,
भालचंद्र भोजने, भूषण शर्मा ,महिला आघाडीचे ज्येष्ठ नेत्या विजाताई चौधरी, शिवसेनेचे जालना शहर प्रमुख विष्णू पाचफुले,आत्मानंद भक्त, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर,यांची विशेष उपस्थितीती होती. तसेच शिवसेना तालुकाप्रमुख कल्याण आवघड, विधानसभा सघटक कैलास दुधानी, ईश्वर झुंबड,भगवानराव कदम, माधव गीते, हरिभाऊ कापसे, अंबादास कळसकर,दिलीप मंत्री,कैलास खैरे,अमोल दाभाडे, कैलास वैद्य,भगवान ढाकणे, अशोक आंबीलढगे, दीपक दिघे, गणेश शिंदे,  राजेंद्र चौधरी ,रामेश्वर नागवे, मनोज शिंदे ,नारायण ब्राह्मणे,रमेश चोरमारे,गणपत केकान,आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
----

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात