देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि.30 ऑगस्ट वार शुक्रवार रोजी महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक संचनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे तालुकास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक संतोष चव्हाण हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जयकुमार तीमोथी, परतुर तालुका माजी क्रीडा संयोजक सरफराज कायमखानी, तालुका क्रीडा संयोजक प्रमोद राठोड, ज्येष्ठ शिक्षक हरकळ सर यांची उपस्थिती होती . 14 वर्षाखालील मुलांमध्ये, नामदेव अर्जुन वाघमारे, विशाल शिवानंद कुकडे, शुभम शिवाजी चव्हाण त्यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवून भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय जालना येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, परतुर तालुका क्रीडा अधिकारी डॉ.रेखा परदेशी, संस्थेचे संचालक संतोष चव्हाण, संस्थेचे संचालक सुबोध चव्हाण, माजी क्रीडा संयोजक सरफराज
कायमखानी, परतुर तालुका क्रीडा संयोजक प्रमोद राठोड यांनी अभिनंदन केले आहे