मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने पासून कोणतीही पाञ महिला वंचित राहता कामा नये व शासनाच्या ईतर योजनेचीही माहीती प्रत्येक नागरीकांना द्यावी- शिवसेना उपनेते आनंदराव जाधव,शिवसेना पक्ष संघटनात्मक बांधणीवर कार्यकर्त्यांनी जोर द्यावा- शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया



परतुर/( प्रतिनिधी)
परतूर येथे शिवसेना उपनेते व शिवसेना विभागीय संपर्क नेते मराठवाडा, आनंदराव जाधव तसेच शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया व मा. आमदार विप्लय बाजोरिया निरीक्षक घनसावंगी विधानसभा मतदार संघ यांनी येणाऱ्या निवडणुका संदर्भिय शिवसेना पक्ष संघटनात्मक बांधणी विषयी शिवसैनिकाशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून आढावा घेतला       
या बैठकीत  शिवसेनेचे उपनेते आनंदराव जाधव यांनी  बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्व पात्र महिला पर्यंत शिवसैनिकांनी पोहोचवावी प्रत्येक गावा गावात गाव तेथे शाखा व घर तिथे शिवसैनिक अशा पद्धतीचे काम शिवसैनिकांनी करावं तसेच युती सरकारने घेतलेले जनमताचे निर्णय सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी शिवसैनिकांनी परिश्रम घ्यावे तसेच शिवदूत नेमणूक बुथ संकलन समिती याचं काम शिवसैनिकांनी काटेकोरपणे करावे. शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना काही सूचना आणि शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणी विषयी चर्चा केली व तसेच गाव तिथे गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक तयार करा आणि महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा व  महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या शासकीय निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवा असेही शेवटी बाजोरिया यांनी सांगितले.
 या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल शिवसेना नेते प्रल्हादराव बोराडे,व्हिजेएनटी ओबीसी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव तरवटे यांनी संघटनात्मक बांधणी विषयी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचलन दीपक हिवाळे यांनी केले
 यावेळी माजी सरपंच सतिश राऊत, शाहरुख शेख, अखिल शेख, अझहर शेख व शेवगा येथील अशोक धुमाळ यांनी मान्यवरांच्या हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला,
 शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, शिवसेना नेते तथा मा सभापती प्रल्हादराव बोराडे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले  परतुर तालुकाप्रमुख अमोल सुरूंग, मंठा तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे,  व्हिजेएनटीओबीसी जिल्हाध्यक्ष शिवाजी तरवटे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख योगेशराव गणगे, युवासेना परतुर तालुकाप्रमुख अविनाश कापसे, प्रणय मोर, कृष्णा अग्रवाल ,दिलीपराव हिवाळे, रामराव वरकड, विधानसभा संघटक विजयकुमार गिरी परतुर शिवसेना शहर प्रमुख दीपक हिवाळे,  उपसरपंच महादेव विर, दत्ता आढाव ग्राम पंचायत सदस्य,
लक्समन काळदाते  आदिनाथ घुगे, उपतालुकाप्रमुख नितीन राठोड ,सोपान कातारे ,बंडू  बोराडे, माऊली वायाळ, विनोद खरात, परतुर महिला आघाडी तालुकाप्रमुख नीता घोंगडे, मंठा महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुनीता देशमुख, काळे ताई, सोनाली राऊत, सविता ताई गवळी, दिनकर शेंडगे, शेख खाजा शेख चांद ,राजाराम भांडवलकर, रणजीत कोल्हे, अंगद खरात, वेंकटेश लिपणे, रामप्रसाद कसाब ,प्रल्हाद शेळके,मुनीर सैय्यद, सबुर देशमुख, आशीर्वाद मोर, लखन जोशी, नोमन शेख, अतुल आर्दड, मिथुन चव्हाण, कैलास ढवळे, अशोक भाऊ घोडे सुंदर भारसाकळे संजय भाऊ राठोड, ओम वाघमारे ,बाळासाहेब मोरे, दादाराव साबळे, अरुण थोरात, श्रीहरी कायंदे ,कैलास चव्हाण, गंगाराम दूगाणे , रतन दूगाणे, बाळु, शेडगे ,कैलास पुरी,सैफ सय्यद अशोक टेकाळे व परतूर/मंठा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात