समर्थ विद्यालयात छायाचित्रे प्रदर्शन.

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
पाटोदा [ माव ]  येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात विवीध जातींच्या सापांचे छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आहे होते.
  नाग पंचमी या  सणाला नागदेवतेचे पुजण श्रध्देने केले जाते. साप हा शेतकर्यांचा मित्र आहे. पर्यावारणाचे संतुलनासाठी सापांचे महत्व अनन्य साधारण आहे. 
प्रत्येक साप हा विषारी नसतो. आपल्या परिसरात सापडणारे बहुतांश साप हे बिनविषारी असतात. भिती पोटी साप दिसताच त्याची हत्या केली जाते.
   विद्यार्थ्यांना बालवयातच विषारी व बिन विषारी साप ओळखता यावेत. त्यांचा अधिवास , शास्त्रीय व बोली भाषेतिल नाव यांचा परीचय व्हावा या साठी या चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी सांगितले .
दरम्यान अनेक गावकर्यांनी प्रदर्शनास भेट देवुन विद्यालयाच्या या ऊपक्रमाचे कौतुक केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विवीध जातींचे सापांची माहिती लिहुन घेतली. 
 कर्मचारी बंधुनी ऊपक्रमाचे यशस्वीते साठी प्रयत्न केले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड