पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा मराठवाड्याच्या गावा-गावातून स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला- पालकमंत्री अतुल सावे
जालना प्रतिनिधी नरेश अन्ना
दि. 17 सष्टेबर मराठवाड्यातील जनतेला निजामाच्या बंधनातून मुक्त करुन भारतीय संघ राज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थानात मोठ्या प्रमाणात सशस्त्र लढा उभारण्यात आला होता. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा मराठवाड्याच्या गावा-गावातून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.