गावांच्या शाश्‍वत विकासासाठी टाटा व्हॉलिंटीअर्सचे काम कौतुकास्पद -डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, टाटा व्हॉलिंटीरिंग वीकच्या माध्यमातून जलसंवर्धन जनजागृती उपक्रम


 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  गावांचा शाश्‍वत विकास साधायचा असेल तर समाजातील सर्व घटकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येणे काळाची गरज आहे. नेमके हेच काम टाटा पॉवरच्या टीमने हाती घेवून अंबा आणि डोल्हारा शिवारात उत्कृष्ट दगडी बंधारा बांधून जलसंवर्धनाचे काम हाती घेतल्याने शिवार बहरले आहे. या उपक्रमाने पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे व्हॉलिंटीअर्सचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोउद्गार जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काढले. 
टाटा व्हॉलिंटीरिंग वीक 22 चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या जलसंवर्धन जनजागृती कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी पांचाळ बोलत होते. पुढे ते म्हणाले की, मराठवाडयात जलसंवर्धनाची कामे टाटा पॉवरनी हाती घेवून शास्वत शेती अन्‌ रोगमुक्त पिके यावर जास्तीत-जास्त भर द्यावा.  हवामान बदल होत असल्याने मराठवाडयात जलसंवर्धन कामे हाती घेतली तर शेतकरी वर्गाचे कल्याण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पांचाळ यांनी टाटा समुह करीत असलेल्या विविध विकास कामांचा संदर्भ देत टाटा समूह आपल्या देशाच्या उभारणीत मोठा वाटा उचलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाप्रसंगी टाटा पॉवर रेन्यूअबल एनर्जी लिमिटेडचे ऑपरेशन आणि मेंटेनेंस विभाग प्रमुख प्रशांत जोशी ह्यांनी टाटा समुह करीत असलेल्या सामाजिक उत्तरदायित्वाची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यांनी टाटा पॉवरच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. दुष्काळी पट्टयातील गावे टँकर मुक्त होत असल्याने लोकांचे जीवनमान उंचावत आहे. एकेरी पीकावरून दोन तीन पिके घेत आहेत. अंबा, डोल्हारा व बाबई मधील ग्रामस्थांनी विकास कामांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
टाटा पॉवर सौर विभागाचे महादेव साबळे यांनी शेतीवर आलेले जलसंकट आणि पर्यावरणीय बदलात तग धरायचे असेल तर शास्वत शेती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करुन, संत महात्म्यांनी वेगवेगळ्या अभंगातून पाणी बचतीचे केलेले आवाहन त्यांनी केले. टाटा व्हॉलिंटीअर्सनी आतापर्यंत केलेल्या शास्वत कामांचा आढावा घेऊन ग्राम विकासाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. 
बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज दाब्रिओ यांनी पाणी बचतीतून सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले. अंबा ग्रामपंचायतीचे सरपंच मेरज खतीब यांनी टाटा पॉवरचे विशेष आभार मानले व भविष्यात शास्वत विकास कामे हाती घेण्याची विनंती उपस्थित टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांना केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सीएसआर विभागाचे अधिकारी विश्‍वास सोनवले यांनी टाटा व्हालिंटरींग वीक चे महत्व आणि उद्देश उपस्थिताना सांगितले. नवोदय व जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थी, शिक्षक, बचत गटाच्या महिला, ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य, वारकरी भजनी मंडळ, युवकांनी मान्यवरांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करून जलसंवर्धन जनजागृती दिंडीत प्रबोधनपर घोषणा दिल्या. ह्या सर्व घटकांचें व टाटा पॉवर व्हालिंटीअर्सचे आभार उपस्थितांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान वडेकर यांनी केले. 100 मेगावॅट परतूर सौर ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी चेतन यादव यांनी आभार मानले. उपविभागीय अधिकारी श्री. पद्माकर गायकवाड, मंडल अधिकारी, तलाठी व इतर शासकीय अधिकारी तसेच बचत गटाच्या महिला, उमेद अभियानाच्या प्रवर्तक, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी ह्यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टाटा पॉवरचे कर्मचारी केशव आनंद, प्रभाकांत शुक्ला, माजी सरपंच प्रशांत बोणगे, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे अर्जुन शरणागते, अशोक कांडेकर, अगस्थ फाउंडेशनचे प्रकल्प शिक्षक प्रवीण राठोड आदींनी परिश्रम घेतले. 

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात