जालना विधानसभेची जागा भारतीय जनता पक्षाला द्या - भाजपा किसान मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांची मागणी



जलना प्रतिनिधी समाधान खरात
जालना विधानसभेची जागा आज रोजी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असून मागील तीन विधानसभा निवडणुकीचा विचार करता काँग्रेस पक्षाने ही जागा शिवसेने कडून हिरावून घेतले आहे ती निवडून आणण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये असून पक्षाने कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवल्यास सहजपणे जागा निवडून आणता येईल त्यामुळे भारतीय जनता पक्षाला जालना विधानसभेची जागा देण्यात यावी अशी मागणी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भाजपा किसान मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांनी पक्षश्रेष्ठींकडे आहे.

जालना विधानसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडून घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा शब्दात अनेक शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला शब्द दिला असून या सर्व बाबींचा विचार करता जालना विधानसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे वेळप्रसंगी आम्हाला शब्द देणारे लोकप्रतिनिधी शिवसेनेचे नेते हे देखील अंधारातून भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यास तयार आहेत लोकसभा निवडणुकीत आमची इच्छा असून देखील भारतीय जनता पक्षाचे काम न करण्याबाबत आमच्यावर प्रचंड दबाव होता असेही या सर्वांनी सांगितले आहे महायुतीने भारतीय जनता पक्षाला जालना विधानसभेची जागा दिल्यास कोणत्याही दबावाला बळी न पडता उघडपणे महायुतीचे काम करू असेही या नेत्यांनी आज रोजी नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला शब्द दिला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाची बाजू भक्कम आहे भारतीय जनता पक्षालाच जालना विधानसभेची जागा सोडावी अशी मागणी आम्ही केली असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांनी दिली

२०१४ चा अपवाद वगळता शिवसेनेची प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पीछेहाट झाली असून विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला बळकटी मिळत आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील मागील ६ - ७ निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी शिवसेनेच्या विधानसभेतील उमेदवाराला जेवढी मते मिळाली आहेत त्यापेक्षा अधिक मते लोकसभा उमेदवाराला जालना विधानसभा कार्यक्षेत्रात मिळाली आहेत अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टी हा एकमेव सक्षम पर्याय या विधानसभा मतदारसंघात असून पक्षाकडे मातब्बर उमेदवार आहेत उमेदवारी कोणाला मिळेल हा प्रश्न नाही परंतु भारतीय जनता पक्षाचा कमळाच्या चिन्हावरील उमेदवार असेल तर निश्चितपणे निवडून येऊ शकतो त्यामुळे आपण पक्षश्रेष्ठींकडे जालना विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्यात यावी यासाठी लवकरच जिल्हा भाजपच्या वतीने शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहे असेही श्री ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांनी स्पष्ट केले आहे

जालना विधानसभा कार्यक्षेत्रात भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद असो पक्षाकडे उमेदवारीसाठी पक्षकार्यात जीवाचं रान करणारे कार्यकर्ते नेते यांच्यासह सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे अनेक मान्यवर त्याचप्रमाणे काही उद्योगपती देखील इच्छुक आहेत त्यामुळे पक्षाचे तिकीट कुणाला मिळेल हा प्रश्न उद्भवत नाही तर ज्याला तिकीट मिळेल त्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रयत्न करतील व ही जागा निवडून आणतील पक्षाने जर संधी दिली तर मी सुद्धा ही विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे असेही श्री ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांनी प्रसिद्धीस दिलेला पत्रकात म्हटले आहे.

लवकरच वीरेंद्र धोका, ज्ञानेश्वर माऊली शेजुळ, जिजाबाई जाधव, प्रा.सुजित जोगस, प्रा.सहदेव मोरे पाटील, प्रकाश टकले, गजानन उफाड, विक्रम उफाड, विकास पालवे, डॉ शरद पालवे, शिवराज नारियलवाले, संदीप हिवराळे, सचिन गाडे, विलास भुतेकर, एकनाथ घाटे, भगवान भुतेकर, उद्धव घाटे, रामजी तुपे, नामदेव घेंबड, विलास मगर, उद्धव शिंदे, विनोद दळवी राहुल पळसपगार, आकाश हंडे, अर्जुन गौरक्षक, सचिन नारियलवाले, जितू मुटकुळे, इम्रान सैयद यांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून निवेदन देणार आहेत.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत