टाळ मृदंगाच्या गजरात बाप्पाला निरोप सांस्कृतिक परंपरा जपत "तरुण" गणेश मंडळ गोळेगाव च्या आकर्षक मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष...

आष्टी प्रतीनिधी 
गाळेगाव येथे टाळ मृदगाच्या गजरात पारंपारिक पद्धतीने बप्पाचे विसर्जन करण्यात आले 
 सध्या च्या काळात कर्कश डि.जे. आणि डोळ्यांना इजा पोहोचणाऱ्या लेझर किरणांचा सर्रास वापर कुठल्याही कार्यक्रमात आत्ता सर्वसाधारण झाला आहे,परंतु या सर्व बाबींना फाटा देत परतूर तालुक्यातील गोळेगाव येथील मानाचा समजला जाणारा तरुण गणेश मंडळ या सर्वांना अपवाद ठरला आहे. 
  टाळ मृदंगाच्या गजरात आणि सुमधुर अभंगाच्या  संगीतात गावातील मुख्य रस्त्याने गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली,रस्त्याच्या दुतर्फा महिला मंडळींनी रांगोळी काढत वारकऱ्यांचे औक्षण केले.विशेष म्हणजे या मिरवणुकीत नवीन पिढीतील तरुणांचा गळ्यात टाळ घेत, विशेष सहभाग जाणवला यामुळे तरुणांच्या मनात नक्कीच पारंपरिक भक्तिभाव रुजेल असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष श्री. गंगाधर दगडू कांडुरे यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षी देखील अशीच हरी नामाची परंपरा कायम राहो, विविध प्रकारच्या पारंपरिक कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी बाप्पा बळ देवो असा विश्वास व्यक्त करत बाप्पांना जड अंतःकरणाने पवित्र अश्या गोदावरी नदीत विसर्जित केले...

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात