सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

श्री. म. माध्यमिक जैन माध्यमिक उच्च माध्यमिक जालना येथील विद्यार्थिनींना दिले स्वसंरक्षणाचे धडे

 जालना प्रतीनिधी नरेश अन्ना
जालना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मा श्री अजय कुमार बन्सल सर पोलीस अधीक्षक जालना व मा. श्री आयुष नोपाणी सर अपर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 12 सप्टेंबर 2024 ते 14 सप्टेंबर 2024 दरम्यान श्री म स्था.जैन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जालना येथे महिला व मुलीच्या स्वसंरक्षणासाठी सेल्फ डिफेन्स कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून आज तीन दिवशीय शिबिरास सुरुवात करण्यात  आली. शिबिराचे उद्घाटन श्री अनंत कुलकर्णी सर उपविभागीय पोलीस अधिकारी जालना,यांच्या हस्ते करण्यात आले.