जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पादचारी पुलाच्या उभारणीनिमित्त वाहतुकीच्या मार्गात बदल


      जालना प्रतीनीधी नरेश अन्ना श्रीपत
 जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुट ओव्हर ब्रिजची उभारणीनिमित्ताने अंबड चौफुली-मोतीबाग जाणारा रस्ता रविवार दि.20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेपासून ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 1 वाजेपर्यंतच्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये राष्ट्रीय महामार्ग 753 वरील अंबड चौफुली-मोतीबाग ते छत्रपती संभाजीनगर चौफुली मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत.
पर्याय मार्ग म्हणून बीड-अंबडकडून येणारी वाहतुक व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतुक  ही जालना येथील मंठा चौफुली-नाव्हा चौफुली-देऊळगाव राजा चौफुली- कन्हैयानगर-भोकरदन चौफुली बायपास मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल. सदरचे आदेश दि.20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेपासून ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत पुलाची उभारणी पुर्ण होईपर्यंत लागू राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
-*-*-*-*-

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात