सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर तालुका कॉग्रेस कमिटी च्या वतीने आधुनिक बुथ कमिटी प्रशिक्षण शिबिर प्रभारी पक्ष निरीक्षक महेश शर्मा यांच्या उपस्थितीत संपन्न....



परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  परतुर-मंठा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस  पक्षाचे बुध कमिटी प्रशिक्षण 359 बुध करिता आयोजित करण्यात आले होते. बुध कमिटीच्या प्रशिक्षणाला तालुक्यातील बुथ कमिटी पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते 
    या वेळी बुथ कमिटीला संबोधित करताना प्रभारी पक्ष निरीक्षक महेश शर्मा म्हणाले की तुम्ही सुरेश जेथलिया यांना आमदार बनवा मंत्रीपद देण्याची जिम्मेदारी मी घेतो.उमेदवारीबद्धल कुठलाही संभ्रम मनामध्ये बाळगू नका. परतूर विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षच लढावणार असून तनमण धनाने कामाला लागा असे सुचक वक्तव्य प्रभारी पक्ष निरीक्षक महेश शर्मा  यांणी बुथ प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करताना त्यांनी प्रतिपादन केले, या वेळी प्रशिक्षणाला मा.आमदार सुरेश जेथलिया, सहप्रभारी बालासाहेब देशमुख,नितीन जेथलिया,विशाल  तौर, ता.अध्यक्ष बाबाजी गाडगे ,बाळासाहेब अंभिरे,इंद्रजीत घनवट,लक्ष्मण शिंदे,मंजुळदास सोळंके,बाबुराव हिवाळे ,रहेमु कुरेशी,सादेक खतीब,राजु भुजबळ, अण्णासाहेब खंदारे,माऊली वायाळ, सुरेश जिजा सवणे, पांडू आबा कुरधने, मंजुळदास,सोळंके, सिद्धू  सोळंके, पंजाब देशमुख, प्रफुल्  शिंदे, हाजी रहमत खान, सादिक जागीरदार, अजीम कुरेशी, अविनाश शहाणे, प्रवीण डुकरे, अनिल आंबेकर, सिद्धू अंभोरे,अमीर पठाण,हाशमी साहब,महिला असंघटित कामगार काँग्रेस ता.अ.सारीका ताई सरवणकर, अलका कोळे महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष परतुर,आदी पदाधिकारी कार्यकर्ता मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत