भीमसैनिकांनी मोठ्या मताधिक्यांनी लोणीकरांना निवडून द्यावे- संजय भालेराव
जालना प्रतीनिधी समाधान खरात
परतूर मंठा नेर सेवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार श्री बबनरावजी लोणीकर यांना मतदार संघातील भीमसैनिक यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन भीम उद्योग अभियानचे अध्यक्ष मा संजय भालेराव यांनी केले आहे, श्री लोणीकर यांनी मतदार संघांमध्ये मागासवर्गीय वस्तीत मागील पाच वर्षाच्या कार्य काळामध्ये प्रत्येकी दहा दहा लाखाचे सभा मंडप 50 गावांमध्ये मंजूर केले असून अंतर्गत सिमेंट रस्ता अंडरग्राउंड नाली हाय मास्क दिवे यासह स्मशानभूमीचा विकास करण्यात आलेला आहे
परतूर मंठा नेर शेवली मतदार संघात मागासवर्गीयांचे रमाई आवास घरकुल योजना मोठ्या प्रमाणात मंजूर करून मागासवर्गीयांना घरे उपलब्ध करून दिली, अनेक मागासवर्गीय वस्तीमध्ये मराठवाडा वाटर ग्रीड योजनेच्या पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे, मंठा येथे मागासवर्गीय मुलींसाठी शंभर विद्यार्थिनीची क्षमता असलेले 15 कोटी रुपयांचे वस्तीगृहाचे सुसज्ज असे बांधकाम करण्यात आलेले आहे, तसेच आंबा ता परतुर येथे सुद्धा मागासवर्गीयांच्या मुलींचे 100 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले 15 कोटीची सुसज्ज वस्तीगृहाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे, अनेक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा प्रयत्न सुद्धा श्री लोणीकर यांच्याकडून करण्यात आलेला असून मतदार संघामध्ये मागासवर्गीयांच्या लेकी बाळींचे सामूहिक मंगल परिणय करून दिल्या असून मोफत मनी मंगळसूत्र, भांडीकुंडी, कपडा लता यासह अनेक विवाहाला आलेल्या वराडी मंडळाची मोफत सोय करून देण्यात आली, मतदार संघामध्ये मागासवर्ग समाजाचे अनेक कल्याणकारी योजना मार्गे लावण्याचे काम श्री लोणीकर यांनी केले आहे, मागासवर्ग्याच्या अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची सोय सुद्धा श्री लोणीकर यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे श्री भालेराव यांनी सांगितले, मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे झाले असून मागील पाच वर्षाच्या कार्य काळामध्ये मतदार संघाचा कायापालट केला असून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणारा नेता श्री बबनराव लोणीकर आहेत, त्यामुळे परतूर मंठा नेर शेवली मतदार संघातील तमाम आंबेडकरी समाजाच्या जनतेला मी नम्र विनंती करतो की आपण भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार मा बबनरावजी लोणीकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावे असे आवाहन श्री संजय भालेराव अध्यक्ष भीम उद्योग अभियान यांनी केले आहे