होमी भाभा परिक्षेत विवेकानंद इंग्लिश स्कूल व विवेकानंद पब्लिक स्कूल चे यश
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
३० नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या होमी भाभा परिक्षेत विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी इ. ०९ वी व ०६ चे अनुक्रमे १९ विद्यार्थी, १९ विद्यार्थी पास झाले असून ०९ वी तून कु. शरयू चंद्रशेखर भांडवलकर तर इ. ०६ वी तून कु. आदित्री प्रमोद आकात व चि. हर्ष जगन्नाथ बागल यांची पुढील प्रात्यक्षिक फेरी साठी निवड झाली आहे.
तसेच विवेकानंद पब्लिक स्कूल परतुर ची इ. ०६ वी विद्यार्थीनी कु. इश्वरी गणेश उबाळे ही विद्यार्थिनी पास झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष डॉ. एस. जी. बाहेकर यांनी केले तर शालेय समिती अध्यक्ष श्री. संदीप बाहेकर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.