भोई गौरव पुरस्कार 2025 साठी नामांकन (प्रवेशिका) पाठवा
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
भोई समाजात प्रतिष्ठेचा समजला जाणारा "भोई गौरव" हा पुरस्कार दरवर्षी "भोई गौरव" या मासिकामार्फत विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या भोई समाज बांधवांना दिला जातो. आत्तापर्यंत भोई समाजातील अनेक मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, संगीत, नाटक, चित्रपट, क्रीडा शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, उद्योग, व्यापार, मत्स्य सहकार, सहकार क्षेत्र, राजकारण, शासकीय निमशासकीय सेवेत विशेष कामगिरी करणारे शासकीय कर्मचारी, उच्चपदस्थ अधिकारी इत्यादी क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या समाजबांधवांना हा पुरस्कार दिला जातो.
वरीलपैकी आपण ज्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्या क्षेत्रातील आपल्या कार्याविषयी थोडक्यात माहिती 9960014116 या व्हाट्सअप नंबर वर किंवा bhoigaurav 981@gmsil.com या ईमेलवर 31 जानेवारी 2025 पर्यंत पाठवा. माहिती पाठवताना आपला मोबाईल नंबर आपला पूर्ण पत्ता तसेच आपला एक फोटो व्हाट्सअप वर पाठवा.
चौकट
अटी शर्ती
प्रत्येक क्षेत्रातील पाच व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केल्या जाईल, निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. मासिकाच्या वर्धापन समारंभात हा पुरस्कार दिला जाईल. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाला त्याच्या वैयक्तिक व्हाट्सअप वर निकाल कळविण्यात येईल. तसेच वर्तमानपत्रात सुद्धा बातमी देण्यात येईल. कार्यक्रमाची तारीख एक महिना आधी कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे 9960014116 या नंबर वर संपर्क करावा.
पोस्टाने माहिती पाठवायची असल्यास कार्यालयाचा पत्ता
भोई गौरव (मासिक)
मुख्य संपादक
चंद्रकांत लोणारे
प्लॉट नंबर 15 दुबे नगर ब्लॉक सी हुडकेश्वर रोड नागपूर 34.