लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी विवेकानंद सेवा केंद्राच्या 4 शाळांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड


परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण 
दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती परतुर अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विवेकानंद सेवा केंद्र संचलित, विवेकानंद इंग्लिश स्कूल (CBSE) चा विद्यार्थी काव्य किशोर पाटील ध्रुव रघुनंदन झंवर, विवेकानंद पब्लिक स्कूल (State Board) ची विद्यार्थिनी संचिता शिवाजी बोराडे, विवेकानंद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी सोहम शशिकांत देशपांडे तसेच विवेकानंद माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी अदिती मोहन ढवळे या सर्वांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच विज्ञान शिक्षक बाळासाहेब मुंडे सर निलेश सरदार सर आकात मॅडम फाजगे सर या सर्वांचे  अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एस. जी. बाहेकर साहेब ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय संदीप दादा बाहेकर, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे साहेब गट समन्वयक कल्याण बागल सर डॉ. स्मिता रोडगे मॅडम अशोक राठोड सर सर्व परीक्षक तसेच सर्व शिक्षकांना अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत