पञकाराच्या प्रामाणिक भूमिकेतून समाजाला फायदा = शरद पाटील यांचे प्रतिपादन बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
तळणी ( प्रतिनिधी ) रवी पाटिल
मंठा तालुक्यातील तळणी येथे दर्पन दिनानिमित्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले भाजपा युवा नेते शरद पाटील याच्या पुढाकाराने दर्पन दिनानिमित्य पञकांराचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना शरद पाटील यांनी जांभेकरांनी पत्रकाराच्या संघर्षाच्या काळात सुरु केलेले हे दर्पन . आजही आदर्श आहे आजच्या विज्ञानाच्या डिजीटल वर्तमानपत्राने अनेक व इतिहास रचले गेले असतील परंतू त्याचे मूळ जनक हे बाळशास्त्री जांभेकर आहेत .
आज ग्रामीण भागातील पञकारांना विविध आवाहने असुन ते प्रामाणिकपणे काम करत असल्याने त्याचा पाया हा भक्कम आहे आजही प्रशासनावर इतर व्यवस्थापनावर एक आदर युक्त भिती ही पञकारांच्या धारदार लेखणी मुळे आहे कोरोना सारख्या महामारीत सुद्धा पत्रकारांची भूमीका समाज मनाच्या हिताचीच होती यापुढील काळात प ञ काराची जबाबदारी दिवसेनदिवस वाढत आहे त्याच्या या प्रामाणिक भूमीकेला समाजाचे पाठबळ निश्चितच असणार आहे आहे असा आशावाद या वेळेत शरद पाटील यांनी व्यक्त केला
दर्पन दिनामित्य निमित्य पत्रकाराचा सन्मान करणे गरजेचे आहे पञकार हा समाज मनाचा आरसा आहे व्यवस्थेला दिशा देण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीतून करत आहेत कोणाचीही बाजू न घेता न्यायाची बाजू आपल्या लेखणीतून मांडण्याचे धाडस एक पत्रकार करू शकतो असे प्रतिपादन मा जि जी प सदस्य उद्धव पवार यांनी हाटेल इंद्रायणी येथे आयोजीत कार्यक्रमात केले
दर्पन दिनाचे औचित्य साधून मंठा ग्रामीण क्रो ऑप सोसायटीचे चेअरमन नितिन सरकटे यांनी तळणी येथील सर्व पत्रकाराना दोन लाख रुपयांचा विमा संरक्षण देण्याची घोषणा केली यामुळे सर्व पत्रकाराच्या वतीने नितिन सरकटे यांचा सत्कार करण्यात आला
या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते