केंद्रीय प्राथमिक शाळा आंबा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
केंद्रीय प्राथमिक शाळा आंबा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तराव घुले पाटील प्रमुख अतिथी कृष्णाजी भदर्गे मा.पंचायत समिती सदस्य दादारावजी बोंनगे केंद्रीय मुख्याध्यापक सी बी पतंगराव सर यांची उपस्थिती होती .
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे पोवाडा गीत यांचे सादरीकरण केले. दिलीप मगर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवना वर प्रकाश टाकला .यावेळी शालेय समितीचे सदस्य तुकारामजी पठाडे रामजी कोरडे विलासराव डोईफोडे सुनील बोंनगे व गावकऱ्यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायणराव राऊत दिलीप मगर बाबुराव पारदेवाड दिनेश लाचुरे भगवानराव शेरे सलीम कायमखानी श्रीमती पूनम पवार श्रीमती शालिनी तोगरे आदींनी परिश्रम केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक पतींगराव यांनी केले तर आभार श्रीमती पूनम पवार यांनी मानले