देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
परतुर (प्रतिनिधी) कैलाश चव्हाण
येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल व भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळेचे संचालक . संतोष चव्हाण, शाळेच्या संचालिका श्रीमती भाग्यश्री चव्हाण, भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
राजमाता जिजाऊ च्या जयंती निमित्त शाळेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील अनेक विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे मावळे व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत आले होते. राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित इयत्ता चौथीच्या मुलींनी सुंदर नृत्य सादर केले. शाळेच्या शिक्षिका श्रीमती दिपाली वाघमारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शाळेची सहशिक्षक गजानन कुकडे यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील अनेक प्रसंग कथन केले. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता. तसेच शाळेच्या परिसरात बाल शिवबा, राजमाता जिजाऊ, शिवबांचे मावळे दिंडी काढून महापुरुषांना अभिवादन केले. यावेळी शाळेची संचालक संतोष चव्हाण, संचालिका श्रीमती भाग्यश्री चव्हाण, उपप्राचार्य प्रदीप चव्हाण, राजेश कार्लेकर, प्रदीप साळवे, गजानन कुकडे, रमेश कदम, शाहीर मुजावर, श्रीमती वंदना ककरीये, स्वाती काळे, मनीषा लहाने, त्रिवेणी गिरी, अश्विनी डोंबाळे, श्वेता पाठक, नीता खोसे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.