खा. कल्याण काळे यांनी खत टंचाई च्या अनुषंगाने घेतली आढावा बैठक

जालना प्रतिनिधी नरेश अन्ना
आज दि 13 जाने. रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जालना जिल्ह्याचे खासदार  कल्याणरावजी काळे यांच्या उपस्थितीत रब्बी हंगाम खत टंचाई च्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये शेतकरी, कृषि निविष्ठा विक्रेते, शेतकरी संघटना यांच्या काही अडचणी व समस्याबाबत चर्चा करण्यात येवून त्यावर उचित कार्यवाही करण्याच्या सूचना खा. काळे यांनी दिल्या आहेत. तसेच खत कंपनीने लिंकिंग करू नये याबाबत बैठकीमध्ये उपस्थित खत कंपन्यांचे प्रतिनिधी यांना सूचना दिलेल्या आहेत तसेच सर्व घाऊक व किरकोळ विक्रेता यांनी देखील कंपन्यांकडून लिंकिंग बाबत विरोध करून ठोस भुमिका घेण्याची सूचना कृषि निविष्ठा विक्रेता संघटेना यांना केली आहे. 
सदर बैठकीसाठी जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती रीता मेत्रेवार, निवासी जिल्हाधिकारी महाडिक , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री गहिनीनाथ कापसे, कृषि विकास अधिकारी  प्रभाकर बनसावडे, मोहीम अधिकारी  निलेशकुमार भदाने व कृषि विभागातील सर्व अधिकारी, खत कंपनी यांचे प्रतिनिधि, खत विक्रेता प्रतिनिधि, शेतकरी संघटना प्रतिनिधि, शेतकरी व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात