सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी केशव खटिंग यांच्या हस्ते...लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे बुधवारी उदघाट्न
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि. 20 - येथील मोंढा भागातील शिवाजीनगरमधील लालबहादूर शास्त्री विद्यालयात बुधवारी (दि. 22) वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून परभणी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक कवी केशव खटिंग यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात येणार आहे.तर मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कपिल आकात हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असल्याची माहिती मुख्याध्यापक एल. के
विद्यालयाच्या मैदानावर सकाळी 11:00 वाजता आयोजित या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहून म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष कुणाल आकात, लालबहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे, निवृत्त प्राचार्य डॉ. भगवानराव दिरंगे, पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला पालक, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक एल. के. बिरादार, पर्यवेक्षक आर. टी. राऊत, टी. जी. घुगे यांनी केले आहे.
लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे स्नेहसंमेलन हे पालक तसेच नागरिकांसाठी दरवर्षी प्रमुख आकर्षण असते.या विद्यालयाच्या वतीने स्नेहसंमेलनासाठी थोर साहित्यिक, लेखक, कविंना आमंत्रित करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कवी, लेखकाला जवळून पाहण्याची, ऐकण्याची संधी मिळते.मागील वर्षी या विद्यालयात सुप्रसिद्ध हास्य कवी प्रा. डॉ. अनंत राऊत यांच्या काव्यगायनाचा कार्यक्रम झाला होता. यावेळी पालक,नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हे विशेष.