सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी विजय यादव तर सचिव पदवी अतुल हजारे.
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
परतुर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2025 ची बैठक शासकीय विश्रामगृह प्रवीण डुकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी सर्वानुमते सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी विजय यादव तर सचिव पदी अतुल हजारे, उपाध्यक्ष शुभम कटोरे, कोषाध्यक्ष संदीप शिंदे, सहकोषाध्यक्ष किशोर ठोंबरे, सहसचिव विठ्ठल सोनपावले, संघटक गोपी ठाकूर, यांची निवड करण्यात आली. तर सल्लागार समिती मध्ये बाबाजी गाडगे, शत्रुघ्न कणसे, विठ्ठलराव बरकुले, सुदर्शन सोळंके, अमोल सुरूग, प्रवीण सातोणकर, संतोष हिवाळे, शामसुंदर चितोडा, सचिन खरात, नामदेव गोरे, प्रवीण डुकरे यांची निवड केली.
याप्रसंगी बैठकीला मुरली सोनखेडकर, ऋषिकेश कराळे, सुनील गायकवाड, श्याम शिंदे, विष्णू मचाले, आदी शिवप्रेमी उपस्थित होते.