समोरच्याकडं लक्ष न देता कामांकडे लक्ष द्यायला हवे-बाबुराव व्यवहारेहॉईस ऑफ मिडियातर्फे दर्पण दिन उत्साहात साजराचौधरी, घेवंदे, देहेडकर,चिन्नादोरे यांनीही आपले विचार व्यक्त केले!...
जालना / प्रतिनिधी समाधान खरात
समोरच्याकडं लक्ष न देता आपल्या कामाकडे लक्ष दिले तरच ते काम व्यवस्थीतरित्या पार पडतं, असे मत ज्येष्ठ छायाचित्रकार तथा बॉम्बे फोटो स्टुडिओचे संचालक बाबुराव व्यवहारे यांनी येथे बोलतांना व्यक्त केले. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तत्पूर्वी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवर पाहुण्यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पहार घालून व पेन देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठार दै. दुनियादारीचे कार्यकारी संपादक भारत धपाटे, संपादक विलास खानापूरे, जेपीसी बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष तथा दै. कृष्णनितीचे संपादक संजय भरतिया, मर्चंड बँकेचे माजी संचालक रविंद्र फुलभाटी, दिकर घेवंदे, रमेश देहेडकर, शेख शफी, सामाजिक कार्यकर्ते तुलजेसभैय्या चौधरी, ज्येष्ठ पत्रकार विनायक दहातोंडे, लक्ष्मण राऊत, दै. आंनदनगरीचे कार्यकारी संपादक रविंद्र बांगड, दै. गोकुळनितीचे संपादक अर्पण गोयल, राजेश भिसे, सीए आकाश मुंदडा, भारत एखंडे, साईनाथ चिन्नादोरे, अहेमद नूर, बद्री उपरे, मधुकर मुळे, राजेश गौड आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली. पुढे बोलतांना श्री. व्यवहारे यांनी आपल्या कार्य काळातील आठवणींना उजाळा दिला. त्यांनी यावेळी मारवाडी आणि राजस्थानी समाजाबद्दल गौरवोद्गार काढून त्यांनी आजच्या आणि कालच्या पत्रकारातेतील फरकही स्पष्ट करुन सांगितला. तर तुलजेसभैय्या चौधरी, दिनका घेवंदे, रमेश देहेडकर, साईनाथ चिन्नादोरे आदींनी आपल्या भाषणातून या कार्यक्रमाबद्दल विकासकुमार बागडी यांचे आभार व्यक्त करुन आज आपण जे काही आहोत, ते पत्रकारांमुळेच असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
येथील हॉटेल मधुबनच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास जालन्यासह मंठा, परतू आणि बदनापूर येथील पत्रकारांसह भरत मानकर, ज्ञानेश्वर ढोबळे, शिवाजी बावणे, शिवाजी म्हस्के, अच्युत मोरे, गणेश काबरा, सुयोग खर्डेकर, लियाकत अली खान, संतोष भुतेकर, अशोक मिश्रा, सदानंद देशमुख, जगदीश शर्मा, सय्यद नदीम, सुनिल नरवडे, भवान साबळे, भगवान निकम, कैलास फुलारी, शिवप्रसाद दाड, अंकुश गायकवाड, कृष्णा पठाडे, सरफराज नाईकवाडे, एल. एम. कुरेशी, इलियास लखारा, सचिन सर्वे, जिल्हा माहिती कार्यालयाचे संतोष पाखरे, कोंडींबा अनपट, देवचंद सारवे, सय्यद नईम, युवराज कुरील, गोपाल गोमंतीवाले, संदीप गायकवाड, गजानन मालकर, अतुल खरात, महादेव जामकर, नटवर किल्लेदार, संजय भगत, मयुर अग्रवाल, गणेश लुटे, शकीलभाई, प्रताप गायकवाड, सांडू तातडे, मितवा रामरख्या, कादरी हूसेन, विनोद काळे, रामधन खरात, शामसुंदर चितोडा, राहुल गायकवाड, सुभाष जिगे, विजय वैष्णव, मुकेश परमार, अनिल व्यवहारे, गौतम वाघमारे, लक्ष्मीचंद जांगडे, श्रीकृष्ण झंवर, आशिश तिवारी, सचिन सर्वे आदी पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी तुलजेस चौधरी यांनी दिवंगत पत्रकार सर्वश्री शशिकांत पटवारी, सुरेंद्र जैस्वाल, रमेश बागडी, उदय पटवारी, शेख अलिम, मनोहर बुजाडे, लक्ष्मण पायगव्हाणे, अबुल हसन, रमण गायकवाड, दिगंबर शिंदे, गणेश जळगांवकर, रमेश पाटील, श्रीकृष्ण भारुका, राजेंद्र तिरुखे, रतनलाल कुरिल, सतीश सुदामे, चंद्रकांत शहाणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
शेवटी उपस्थितीचे आभार व्हॉईस ऑफ मिडीयाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी मानले. तर कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन रविकांत दानम यांनी केले.