गोंदी पोलिसांनी रोड रॉबरी करणारे तीन आरोपीला केले जेरबंद
जालना प्रतीनीधी नरेश अन्ना
दि.13/01/2025 रोजीरात्री 12.30 वा. सुमारास हॉटेल मनोज जवळ रामेश्वर नारायण बुलबुले वय 39 वर्ष व्यवसाय नौकरी रा. दैठणा खुर्द ता. अंबड जि. जालना ह.मु गेवराई ता. गेवराई जि.बिड यांना शहागड येथील सागर हॉटेल वर जेवण करुन निघुन बस स्टैंड समोरील पेट्रोलपंपवर पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना तिन आज्ञात आरोपीतांनी फिर्यादीची होन्डा कंपनीची युनिकॉर्न मॉडलची मोटारसायकल जिच क्र MH-21-BS-5713 आडवुन चाकुचा धाक दाखवुन त्यांच्या खिश्यातील दोन मोबाईल व फिर्यादीच्या ताब्यातील मोटारसायकल ही बळजबरीने हिसकावुन नेली म्हणुन गोंदी पोलीस स्टेशनला गुरन. 09/2025- कलम 309 (4), 3 (5) बीएनएस 2023 प्रमाणे एकुन गेला माल ज्. वा किं. अं 110000/- एकूण किंमतचा गुन्हा दिनांक 13/01/2025 रोजी 14.23 वाजता दाखल करण्यात आलेला होता. सदर तिन्ही आरोपीतांचा घटना घडल्यापासुन पोलीस शोध घेत होते. तांत्रिक माहितीद्वारे सदर चोरटे हे गुन्हा घडल्यानंतर छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने गेल्याची माहिती प्राप्त झाल्यावर छत्रपती संभाजी नगर शहरच्या पोलीसांचे मदतिने त्यांना शिताफीने तात्काळ ताब्यात घेतले. सदर आरोपी क्र. 01 अमेर खा अकबर खा वय 28 वर्षे रा. कानडी रोड, कोकशहा पिरदर्गा रोड केज जिल्हा बिड.. मोबाईल क्रमांक 9764456455 याचेवर यापुर्वी ही ह्याच्या वर अनेक पो. स्टे.मधे गुन्हे दाखल आहे आरोपी क्र. 02 जुबेर मुस्ताक फारुकी वय 28 वर्षे रा. रोजा मोहल्ला ता. केज जि. बिड मोबाईल क्रमांक 93069375107 याचेवर ।) केज पो.स्टे. जि. बिड आरोपी क्र. 03 आवेज खाजा शेख वय 27 वर्षे रा. कानडी रोड कोकशहा पिरदर्गा रोड केज जिल्हा बिड.. मोबाईल क्रमांक 7875870116 या सर्व आरोपीवर केज येथे गंभिर गुन्हे दाखल आहेत.