कपील आकात यांनी केला रोहित काळे यांचा सत्कार
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर - पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल रोहित काळे या विद्यार्थ्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील भैया आकात यांनी मंगळवारी यथोचित केला.
रोहित काळे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरिक्षक निवड चाचणी परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे.या यशाबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष कपिल भैय्या आकात यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक काळे,नगरसेवक विजय नाना राखे,अखिल काजी सर,सय्यद आरेफ अली,कदिर भाई कुरेशी,नासेर चाऊस,रज्जाक कुरेशी,संजय राऊत,युवकचे शहराध्यक्ष राजेश तेलगड यांची उपस्थिती होती.