विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चारित्र्य संपन्न व्हावे.ए.पि.आय. ईंगेवाड.
पाटोदा [ माव ] कैलाश चव्हाण
शालेय जीवनात शिक्षणासोबतच बलोपासना करुन चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व घडवावे असे प्रतिपादन आष्टी पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. एस. एम. ईंगेवाड यांनी केले..
श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थीनीची सुरक्षितता या समुपदेशन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना त्यांनी विद्यार्थीनी सोबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तण चालणार नाही अशा गैरवर्तनासाठी शिक्षा म्हणुन असलेला " पोक्सा ", कायदा सहज शब्दात समजुन सांगितला.
संपुर्ण महाराष्ट्रात शालेय विद्यार्थीनीची सुरक्षितता या संदर्भात शासनाने दिशा निर्देश दिले आहेत त्याचाच एक भाग म्हणुन सदरील कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते. ईंगेवाड यांनी अनेक विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्णाची ऊत्तरे देवुन प्रेरणा दिली. विद्यालयाचा संपुर्ण परीसर सि.सि.टि.व्ही च्या कक्षेत असल्यामुळे समाधान व्यक्त केले. विद्यार्थीनीच्या सुरक्षितते संदर्भात विद्यालय करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
प्रारंभी श्री सरस्वती देवता व भारत मातेच्या प्रतिमांचे पुजन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास मंडळाचे ऊपाध्यक्ष तुळशीदास खवल , कोषाध्यक्ष प्रभाकर कादे , सरपंच हरीभाऊ खवल , तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवाजी कादे , ग्रा.प. सदस्य सदुभाऊ खवल ,गणेशराव खवल , लक्ष्मण शिंदे , भिमराव शिंदे. बालासाहेब नखाते , भाऊसाहेब कादे , पंडीत मुंढे ,सुरेश शिंदे , गोरख वखरे , पो.काॕ.देवळे साहेब व पो.काॕ. शिंदे मोठ्या संख्येने विद्यार्थी ऊपस्थीत होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर तर सुत्र संचालन चत्रभुच खवल यांनी केले. सर्व कर्मचारी ऊपस्थीत होते.