जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी क्रांतिगुरू लाहुजींची प्रखर देशभक्ती तरुणांना प्रेरणादायी देणारी-दगडुबा घोडे यांचे प्रतिपादन
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
लहुजींचे वडील क्रांतिकारी राघोजी साळवे इंग्रजां
विरुद्धच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले.त्याप्रसंगी देशभक्त क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाची सुटका व्हावी या प्रेरणेतून जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी अशी भीष्मप्रतिज्ञा घेतली. क्रांतिगुरू लाहुजी वस्ताद साळवे यांची प्रखर देशभक्ती तरुणांना प्रेरणादायी देणारी आहे असे प्रतिपादन समाजसेवक दगडुबा घोडे यांनी केले.परतूर येथील रेल्वे स्टेशन समोरील मुख्य मध्य मार्गावरील लहुजी चौकात क्रांतिगुरू लाहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले याप्रसंगी विलासराव, लोखंडे, प्रकाश लोंढे, सुंदर हिवाळे,विजय वाणी यांची उपस्थित होती
पुढे बोलतांना दगडुबा घोडे म्हंणले की, लहुजींच्या आखाड्यात व्यायामाचे धडे घेण्यासाठी व शरीर बळकट करण्यासाठी ज्योतिबा फुले,लोकमान्य टिळक,वासुदेव बळवंत फडके, विठ्ठल वाळवेकर, नाना मोरोजी, नाना छत्रे ,उमाजी नाईक सखाराम परांजपे, सदाशिव बल्लाळ,गोवंडे गुरुजी आदींनी प्रशिक्षण घेतले लहुजींच्या या शिष्यांनी भविष्यात आपापल्या आवडीनुसार, ध्येयानुसार सामाजिक, राजकीय व क्रांतिकारी क्षेत्रात कार्य करून नावलौकिक मिळवला. लहुजींनी सर्व शिष्यांना कुस्ती ,दांडपट्टा ,लाठीकाठी,नेमबाजीचे प्रशिक्षण दिले.
लहुजी वस्ताद आयुष्यभर अविवाहित राहून भीष्मप्रतिज्ञाचे जीवनाच्या अंतापर्यंत पालन केले. इंग्रजांविरोधी क्रांतिकारकांची पलटण उभी केली. स्वतः भूमिगत राहून राष्ट्रकार्यासाठी अखंडपणे इंग्रजांशी झुंजत राहिले.वस्ताद लहुजी व त्यांच्या त्यांचे शिष्य पुढच्या काळात भूमिगत होऊन क्रांतिकारी कार्य करीत होते.आजच्या तरुणांनी क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांचे आचरण करावे.असे यावेळी दगडुबा घोडे यांनी व्यक्त केले.