शेतकऱ्यांचे सोयाबीन, हरबरा, गहु, तुरी, ज्वारी चोरी करणाऱ्या टोळी कडुन 10,77,000/- रुपये किमंती मुद्येमाल जप्त.जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जालना प्रतीनीधी नरेश अन्ना
दिनांक 202025 . जालना जिल्ह्यात शेती माल पिक ज्यात प्रामुख्याने सोयाबीन, हरबरा, गहु, तुरी या धान्य पिकाचे चोरी चे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा. श्री. अजय कुमास बंसल, पोलीस अधीक्षक जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव  जालना यांचे मार्गदर्शनाखाली  पथक तयार करुन कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते . त्या अनुषंगाने दिनांक 19/03/2025 रोजी पथक धान्य पिकाची चोरी करणारे गुन्हेगारां बाबत माहिती घेत असतांना त्यांना गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषण आधारे माहिती मिळाली की, पोलीस ठाणे जाफ्राबाद हद्यतील मौजे मसरुळ शिवात जाफ्राबाद ते माहोरा रोडवरील पत्राचे गोडावून येथील सोयाबीन चोरी ही बळीराम रावसाहेब फुके रा. उमरखेडा ता. भोकरदन याने त्याचे साथीदारासह केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावरुन सदर पथकाने बळीराम रावसाहेब फुके वय 23 वर्षे, रा. उंमरखेडा, ता. भोकरदन याचा शोध घेऊन त्यास दिनांक 19/03/2025 रोजी मौजे लोणगाव येथुन ताब्यात घेतले. त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार 2)संदिप गणेश वाघमारे वय 32 वर्षे, रा. सावखेड भोई ता. देऊळगावराजा, 3) आनंद उत्तम मोरे वय 32 वर्षे, रा. आखणी, ता. मंठा, 4) प्रकाश राजु झिने वय 22 वर्षे, रा. लोनगाव व त्याचे आणखी तीन फरार साथीदार यांच्या मदतीने पोलीस ठाणे जाफ्राबाद, मंठा, भोकरदन, बदनापुर, मौजपुरी च्या हद्यीत वेगवेगळ्या गावात सोयाबीन, हरबरा, गहु, तुरी, ज्वारी चे धान्याचे कट्टे चोरी केल्याचे सांगुन 08 गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपी 1) बळीराम रावसाहेब फुके 2)संदिप गणेश वाघमारे वय 32 वर्षे, रा. सावखेड भोई ता. देऊळगावराजा, 3) आनंद उत्तम मोरे वय 32 वर्षे, रा. आखणी, ता. मंठा, 4) प्रकाश राजु झिने वय 22 वर्षे, रा. लोनगाव यांचे कडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहे. अ.क्र 1 2 3 4 5 6 7 8 पोस्टे जाफ्राबाद गुरनं 242/2024 कलम 334 1,48,000/- रुपये किंमती 74 कट्टे सोयाबीन (1) 305 (A) भान्यास | पोस्टे जाफ्राबाद गुरनं 205 / 2024 कलम 334 (1) 305 (a) भान्यास पोस्टे भोकरदन गुरनं 287/24 334 (1) 305 (a) भान्यास 4,50,000/- रु किंमती महिंद्रा पिकअप, MH21-BH-6189 3000/- रुपये किमंती 5 कट्टे गहु 36,000/- रुपये किमंती 18 कट्टे सोयाबीन, 5000/- रुपये 1 कट्टा हरबरा पोस्टे वदनापुर गुरनं 467/2024 कमल 303 20,000/- रुपये कि 10 कट्टे सोयाबीन (2) 305 भान्यास पोस्टे मोजपुरी गुरनं 39/2025 कलम 303 (2) भान्यास पोस्ट भोजपुरी गुरनं 146 / 2024 कलम 379 भादंवि पोस्टे मोजपुरी गुरनं 201/2024 कलम 461 भादंवि पोस्टे मंटा गुरनं 117/2025 कलम 334 (1) 21,000/- रु कि 6 कट्टे हरबरा 3,00,000/- रुपये किंमती स्विफ्ट कार MH 12-PQ9535 10,000/- रु कि 05 कट्टे सोयाबीन, 6500/- रु कि 5 कट्टे गहु, 2500/- रु किं 3 कट्टे ज्वारी एकुण 19000/- 5000/- रु कि 02 कट्टे हरबरा 50,0000/- रु कि 20 कट्टे तुर असा एकुण 10,77,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपीतांना पुढील गुन्ह्याचे तपासकामी पोलीस ठाणे जाफ्राबाद व पोलीस ठाणे मौजपुरी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही मा. श्री. अजय कुमार बंसल (भापोसे) पोलीस अधीक्षक जालना, मा. श्री. आयुष नोपाणी (भापोसे) अपर पोलीस अधीक्षक जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, श्री. योगेश उबाळे, सहा. पो. निरी, श्री. राजेंद्र वाघ, पोउपनि, पोहवा सॅम्युअल कांबळे, प्रशांत लोखंडे, विजय डिक्कर, धिरज भोसले, योगेश सहाने, सोपान क्षीरसागर, सागर बाविस्कर, रमेश राठोड, कैलास खार्डे, सतिष श्रीवास, रमेश काळे, इरशाद पटेल, भाऊराव गायके,आक्रुर धांडगे, कैलास चेके, किशोर पुंगळे, सौरभ मुळे, गणपत पवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत