सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांना स्व. बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार जाहीर, परतूरमध्ये 9 मार्चला जयंती दिनी रंगणार पुरस्कार वितरण सोहळा


परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण 
  ,दि.5 - शिक्षण तथा सहकार महर्षी स्व. बाबासाहेब भाऊ आकात यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्व. बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार प्रसिद्ध चित्रपट अभिनेते तथा मराठवाड्याचे भूमिपुत्र मकरंद अनासपुरे यांना जाहीर झाला आहे.येत्या रविवारी (दि. 9) भाऊंच्या जयंती दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते हा पुरस्कार अनासपुरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य कपील आकात हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असल्याची माहिती समन्वय समितीच्या वतीने बुधवारी (दि. 5) आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 
   या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा. डॉ. रणजितसिंह निंबाळकर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दासू वैद्य,विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. भागवत कटारे,प्राचार्य डॉ. शिवाजी मदन हे उपस्थित राहणार आहेत.
     तर यावेळी मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. कुणाल आकात,विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. भास्कर साठे, विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा. डॉ. मुंजा धोंडगे यांचीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणार आहे.
     येत्या रविवारी दि. 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता लालबहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयाच्या स्व. बाबासाहेब भाऊ आकात सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे,प्राचार्य डॉ. माणिकराव थिटे,डॉ. सुधाकर जाधव,मुख्याध्यापक एल. के. बिरादार,शेषराव वायाळ, राजेश नवल यांनी दिली.दरम्यान, पुरस्काराचे हे तिसरे वर्षे असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात