वंचित बहुजन महिला आघाडी च्या वतीने पं.स.परतूर येथे अनुपस्थित कर्मच्याऱ्यांच्या खुर्ची ला हार घालून गांधीगिरी आंदोलन.
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
दिनांक १० मार्च रोजी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी चे वतीने परतूर पंचायत समिती मध्ये शिष्टमंडळ विविध प्रश्न उपस्थित करण्याकरिता बहुसंख्येने पोहोचले .परतूर पंचायत समिती मधे सध्या प्रचंड गोंधळ अनागोंदी चालू आहे सर्वसामान्य घरकूल लाभार्थी बिला साठी पैसे दिल्याशिवाय बिले दिले जात नाहीत शेतकऱ्यांचे विहिरीचे बिल काढायला लाभर्थी पैसे दिल्याशिवाय बिले अदा केले जात नाहीत ग्रामपंच्यायातीत प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे सत्ताधारी ग्रामपंचायती मध्ये विरोधकांना त्रास दिला जात आहे विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे शासनाने ५ दिवसाचा आठवडा केला त्या अनुसंह्यंगाने अधिकारी सकाळी ९:४५ ते ६:१५ पर्यंत कार्यालयात उपस्थित असणे बंधनकारक आहे असे असताना पंचायत समितीत अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर असतात सोमवारी कार्यालयात उपस्थित असणे गरजेचे असताना देखील आज गटविकास अधिकारी यांच्या सह अनेक अधिकारी कर्मचारी गैरहजर होते त्यामुळे गटविकास अधिकारी यानच्या खुर्चीला निवेदन आणि हार घालून गांधीगिरी करून निषेधात्मक आंदोलन करण्यात आले परतूर पंचायत समिती मध्ये सर्व सावळा गोंधळ सुरू आहे याचा वंचित बहुजन आघाडी ने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असूून कारभार सुधारा नसता वंचित बहुजन आघाडी ही वंचित स्टाईलने आंदोलन छेडले
यावेळी मा नगराध्यक्ष मंगलताई पाणवले येणूताई लांडगे सुमनताई गरड मीराताई पहाडे उषाताई पहाडे वर्षा सोनपसारे रामप्रसाद थोरात पडघाणे ताई रवींद्र भदर्गे दिपक वक्ते राहुल नाटकर महादेव पैठणे स्वप्नील पहाडे प्रशांत वाकळे गौतम मुंढे बाळाभाऊ भालेकर भगवान वाडमारे विठ्ठल तरसे भगवान वाघमारे गौतम गरड अश्योक वाघमारे रामचंद्र पाणवले चोखा सौंदर्य जमीर मिलिंद मगर अर्जुन शेजुळ सुरेश लहाडे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते