हातड येथील जी.प. शाळेत माता पालक मेळावा संपन्न






परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
            दिनांक 10 मार्च सोमवार रोजी सकाळी दहा वाजता जि.प.प्रा.शाळा हातडी ता.परतूर येथे शाळेच्या प्रांगणामध्ये माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये गावातील माता पालक भगिनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माता पालक मेळावा आयोजन करण्याचे प्रयोजन म्हणजेच विद्यार्थी-शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये योग्य तो सुसंवाद निर्माण व्हावा व त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी. हेच उद्दिष्ट ठेवून या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून गावच्या सरपंच श्रीमती.रेणुकाताई झरेकर या उपस्थित होत्या,तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच श्रीमती.मीनाताई गाढवे,कु.ठाकुर मॅडम(आरोग्य कर्मचारी),श्रीमती.गाढवे मॅडम(आरोग्य कर्मचारी), श्रीमती.डाॅ.अनुजा बिनगे ( गोरे) मॅडम, श्रीमती.सुचिता कुलकर्णी मॅडम(स.शि.) ह्या लाभल्या होत्या.
           कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व सर्व माता पालक यांचे स्वागत पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती. अंबुलगे मॅडम यांनी केले.अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यामध्ये कुलकर्णी मॅडमनी मुलांना अभ्यास कसा करावा याबद्दल माहिती सांगितली. बिनगे मॅडमनी मुलींनीं त्यांचा आहार व शारीरिक काळजी घेण्याबद्दल मार्गदर्शन केले. ठाकूर मॅडमने मुलींना मासिक पाळी व गर्भाशयाचे कॅन्सर याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. आरोग्याची काळजी घेण्याबाबत सर्व माता पालकांमध्ये व किशोरवयींन मुलींमध्ये जागृती निर्माण केली. तसेच गाढवे मॅडम यांनी सुद्धा आपले अनुभव व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये माता पालकांसाठी संगीत खुर्ची व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा आनंद सर्व माता पालक भगीनींनी घेतला.त्यातून विजेते स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती.उबाळे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती. सुरूंग मॅडम यांनी केले.
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक  जोगडे सर,उफाड सर,ठाकरे सर गीरी सर, गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात