शास्त्रात जन्मभूमीचे ऋण आणि आईचे ऋण हे आहे ते कधीच मनुष्य विसरू शकत नाही - हभप प्रवीण महाराज खंदारे

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
शास्त्रात जन्मभूमीचे ऋण आणि आईचे ऋण हे आहे ते कधीच मनुष्य विसरू शकत नाही आहे या दोघांची जी काही उंची आहे स्वर्गापेक्षा जन्मभूमी अत्यंत श्रेष्ठ आहे स्वतः रामचंद्र प्रभू सांगतात रामायणातला प्रसंग आहे का ज्या वेळेला प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला व सीता परत मिळवली 
  त्याच्यानंतर ज्या वेळेला अयोध्ये कडे जाण्याचा जो काही प्रसंग निर्माण झाला त्यावेळेला लक्ष्मणजी त्यांचे छोटे बंधू राज हे रामचंद्र प्रभू कडे गेले आणि त्यांना म्हणाले दादा आता आयोध्याकडे कशाला जायचंय आता काय करा अशी ही तुम्ही लंका जिंकली त्यातल्या त्यात आयोध्या अयोध्ये पेक्षा सुद्धा लंका ही कशी आहे छान आहे चारही बाजूने कसा आहे समुद्र आहे त्यातल्या त्यात ती सोन्याची आहे आयोध्या सोन्याची आहे का नाही मग काही सोन्याची सोन्याची अशी नगरी असताना तुम्ही नाहीत तिकडे कशाला चाललात बरं तिथं भरताचा आधीच राज्याभिषेक झालेला आहे आईचे आज्ञेने व भरताचा
 राज्याभिषेक आधीच झालेला आहे तर तुम्ही एवढं सगळं सोन्याचं एश्वर्य सोडून जात आहे रामचंद्र प्रभूच्या मुखातले वाक्य तुम्हाला अतिशय सुंदर वाक्य रामचंद्र प्रभू सांगतात लक्ष्मणा ही लंका सोन्याची जरी असली तरी सुद्धा मला ती आवडत नाही मला ती माझं मन इथं रमत नाही सुवर्णमयी लंकां आपली जन्मभूमी होऊ शकत नाही आपली भूमी ती आपलीच असते असे प्रतिपादन ह भ प प्रविण महाराज खंदारे यांनी कानडी येथे पहिल्या दिवशीच्या किर्तन सेवे प्रसंगी केले एक तत्व नाम साधती साधन या हरीपाठातील अंभगावर चितंन केले 



 नामाचे महत्त्व हे पहिल्या दिवशी सांगण्याचे कारण म्हणजे हा पहिल्या दिवशी कीर्तनकारांनी नाम सांगावं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवसापर्यंत ज्ञान भक्ती वैराग्य तसेच संत चरित्राचा त्या ठिकाणी अभंगावर कीर्तन करावं सातव्या दिवसाला सहाही दिवसांच्या जे काही आपण कार्य केलेले त्याचं मागणं भगवंताकडे मागावर आणि आठव्या दिवशी भगवान परमात्म्यांना त्या ठिकाणी गोकुळामध्ये केलेला लिलेच वर्णन करावे महाराज पहिल्या दिवशी नामाचा चिंतन करा व दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी एक काय सहा दिवस तुम्ही सांगतात भक्तीच्या ज्ञानाच्या वैरग्याच्या गोष्टी कराव्यात सहाव्या सातव्या दिवसाला त्या ठिकाणी मागणी मागायची म्हणताय आठव्या दिवसाला त्या ठिकाणी काल्याचे किर्तन भगवंताच्या लिलांचे चरित्र कीर्तन करायचं म्हणताय असं का असं का म्हणल्यानंतर येथे त्या ठिकाणी उत्तर मिळतात आम्हाला आमचे जे काही जेष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत त्यांनी घालून दिलेला शिष्टाचार आहे तो पहिल्या दिवशी कीर्तनकाराने पाळावा नामाचे महत्त्व सांगावं पहिल्या दिवसाच्या कीर्तनकार आणि त्या ठिकाणी नामाचे महत्त्व कशासाठी बर खऱ्या अर्थाने पहिल्या दिवस हा मंगलाचा असतो कशासाठी मंगल मंगलम आचार्य हाती धरलेल्या कामाचं त्याठिकाणी योग्य वेळेला गणपतीचे नमन करणे कारण तसंच ह्या सप्ताहामध्ये सुद्धा कीर्तन सुरू आहे आत्ताची सुरुवात करत असताना सुरुवातीला काय करावं मंगल करावे त्याच्यासाठी काय आहे या ठिकाणी या साधुसंत मंडळींनी जुन्या मंडळींनी घालून दिलेला हा शिष्टाचार आहे . एवढे सांगा सुंदर ज्ञान त्या ठिकाणी आपल्यासमोर मांडलं पण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मध्ये काही शब्द घातले महाराज ते ज्ञानोबाराय म्हणतात उद्या कोणीतरी म्हणेल ज्ञानोबारायांनी हा ग्रंथ लिहिला ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर ज्ञानोबारायांनी काय केलंय तर या गीतेचा भाषांतर त्या ठिकाणी केलेला आहे असं सगळं जर कोणी म्हणेल तर ज्ञानोबाराय म्हणतात याच्यामध्ये माझा काही मोठेपणा नाही उद्या उठून कोणी म्हणेल की ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानेश्वरी लिहिली तर ज्ञानोबाराय म्हणतात याच्यामध्ये माझा काहीही मोठेपणा नाही त्या ठिकाणी सांगतात व्यासांचा मागोवा घेतो भाष्य करा ते वाट पुसतो ज्ञानोबाराय म्हणतात हा व्यास मुनी जसे जसे केलेत ना गीतेमध्ये तसं तसं मी त्यांच्या त्यांच्या मागे मागे गेलो 

   ज्ञानोबारायांनी आपल्याकडे काहीही मोठेपणा केल्याने घेतलेला नाही त्यांच्या मागे मी चाललो आहे ज्या मार्गाने वेद गेलेले त्याच मार्गाने आम्ही सुद्धा आमचा काय करतोस मार्गक्रमण करतोय हा पहिल्या दिवशी नामाचा चिंतन करावा कारण हा पहिल्या दिवशी काय करावं मंगलभाव समाप्ती काम मंगलम आचेवर पहिल्या दिवशी काहीतरी मंगल व्हावं त्याच्यासाठी भगवंताच्या नावाचा चिंतन करायचंला ज्याला म्हणतो ते खऱ्या अर्थाने मंगल आहे का . ज्ञानोबा म्हणतात ना मंगळाच्या अंकुरी सवेची मंगळाची पडेल पोहरी नंतरच्या काळामध्ये काय होतं ते अमंगल मध्ये त्याचे रूपांतर होतं सुरुवातीला पुत्र प्राप्त झाल्यावर माणसाला मंगल वाटते परंतु नंतर तो अमंगल वाटतो जन्मदि माणसाला हे काय आहे सुरुवातीला काय वाटतं हे मंगळ आहे सांगतात या जगामध्ये मंगळ काहीच नाही का संसारातल्या गोष्टी काही मंगळ नाहीतच .

 साधुसंताला विचारतो खऱ्या अर्थाने जगामध्ये मंगळ काहीच नाही तो आम्ही लेकराला मंगळ समजत होतो ज्ञानोबारायला विचारतो की खरंच या अर्थाने आपण खऱ्या अर्थाने जर आम्हाला मंगळ या जगामध्ये काही सापडत नाहीये आणि अर्थाने जगामध्ये मंगळ काही नाहीच का ? मंगलम किंवा मंगलम भगवानष्णु श्री विठ्ठलाचे नाम वाहते ते आपल्या साठी मंगल आहे म्हणून ते नाम आपल्या आचरणात असणे गरजेचे आहे .भगवान मंगळाचा मंगळ साठा आहे परमात्मा हा का मंगळाचा निधी आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने भगवंताचे नाम या ठिकाणी काय आहे मंगळ आहे त्याच्यासाठी पहिल्या दिवशी काहीतरी मंगल व्हावं पहिल्या दिवशी त्याच्यासाठी भगवान परमात्म्याचे त्या ठिकाणी नाम सप्ताह मध्ये चिंतनावर होणे गरजेचे आहे . भगवान परमात्म्याचे पहिल्या दिवसाला काय तर नामाचं महात्मा त्या ठिकाणी कीर्तनकार सांगितलं पाहिजे भगवान परमात्म्याचे नाव अतिशय मंगल आहे 

इतर कुठल्याही साधनेक्षा ज्ञान साधना ही सोपी आहे व ती मनुष्याच्या उद्धाराची व हिताची आहे नाम साधना ही तुकोबांनी केली नाम साधना हे ज्ञानोबांनी केली तीच ज्ञानसाधना तुम्ही आम्ही केली तर आपले जीवन सार्थकी झाले असे समजावे असेही महाराजांनी शेवटी सांगितले

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात