तळणी येथे संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
मंठा तालुक्यातील तळणी येथे आज पूर्ण ग्रामस्थ व मराठा समाज बांधवांच्या वतीने संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले निर्दयीपणे झालेल्या या हत्तेचा यावेळेस ग्रामस्थांच्या वतीने निषेध करण्यात आला 
तसेच पुढील राहिलेल्या व या घटनेची संबंधित असलेल्या सर्वांची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली यावेळी सरपंच गौतम सदावर्ते राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे नितीन सरकटे ग्रामपंचायत सदस्य सुधाकर सरकटे सह मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती होती