देव देश धर्मासाठी जो तत्पर असतो त्यावरच भंगवंताची कृपा ह भ प समाधान महाराज भोजेकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसा निमीत्त तळणी येथे किर्तन


तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
   किर्तन म्हणजे एक अन्टिव्हायरस आहे डोक्यामध्ये गेलेला दुषीत वायरस काढण्यासाठी दोन तासाचे किर्तन पुरेसे आहे . ज्यांच्याकडे अध्यात्मीक संस्काराचा पगडा आहे अशानांच भगवत भक्ती करण्याचे भाग्य लाभते व भगवंत न कळत हे भगवत कार्य त्यांच्या कडून करूनच घेतो . भाग्यंवता घरीच भजन पूजन कीर्तन व पूर्वजाच्या पुण्याईच्या आशीर्वादाने हे सत्कर्म घडत असतात असे प्रतिपादन ह भ प समाधान महाराज भोजेकर यांनी तळणी येथे केले माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्य शरद पाटील भगवान देशमुख यांनी या एक दिवसीय किर्तनाचे आयोजन केले होते 

आपुलीया हीता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कण्या पूञ होती जे सात्वीक तयाचा हारीक वाटे देवा या जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगावर निरुपण केले . मनुष्याने देवाला अशी प्रार्थना करावी की मला होणारी संतंती ही धनवान नको भाग्यवान जन्माला घाला . ज्याच्यामुळे किर्तन भजन श्रवण करण्याचा व सांगण्याचा योग आला तो भाग्यवानच असतो भजन पूजन आणि कीर्तन हे फक्त भाग्यवंताच्या घरीच होऊ शकते जो परमार्थिक वृत्तीचा आहे त्याच्यावर भगवत भक्ती झाल्याशिवाय राहत नाही देवासाठी देशासाठी धर्मासाठी जेव्हा आपण काही करतो त्यावेळेस भगवंताची कृपा संपादित केल्याचे सिद्ध होते देव देश आणि धर्म यासाठी ज्यावेळेस मनुष्य काही करू लागतो त्यावेळेस आपण असे समजावे की आपल्यावर देवाची कृपा झाली आहे ह्या गोष्टी कोणाच्याही वाट्याला येत नाही परंतु आजकाल स्वार्थी भक्तीचे ढोंग जास्त वाढत चालले आहे ज्याला की भगवंताकडे थारा नाही व आपल्या मनालाही त्यामुळे समाधान मिळत नाही भगवत भक्ती आपण अशी करावी ज्याने की आपल्या चित्ताला समाधान व देवाला आनंद मिळावा अशी भगवद्भती आपण करावी ढोंगी भक्ती करण्यासाठी जर परावृत्त होत असेल तर आपले पूर्व कर्म आहेत की आपल्या हातातून चुकीचे कर्म घडत आहे

आजकालची तरुण पिढी ही वरातीत आणि निवडणुकीत दूषित होत आहे व्यसनाधीन होत आहे प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांचे कर्तव्य आहे किंवा ते असले पाहिजे की माझ्या समाजातील तरुण हा व्यसनाचारी होऊ न देणे याची सामाजिक जबाबदारी घेऊ राज्यकर्त्यांनी मार्गक्रमण करणे गरजेचे आहे समाजातील तरुण हा व्यसनाच्या आहारी न जाण्यासाठी आपली नीती आपले धोरण त्याच अनुषंगाने असले पाहिजे की ज्याचा उदो उदो समाजाने केला पाहिजे ह्या गोष्टी जर राज्यकर्त्याकडून होत असतील तरत्याला भविष्य असल्या शिवाय राहणार नाही नुसता अशा राज्यकर्त्याचा समाजाने स्वीकार करू नये

आजकालच्या तरुण मित्रांनी मैत्रीचा आदर्श कोणाचा घेतला पाहिजे तर तो कवी कलश आणि छत्रपती धर्मवीर संभाजी राजांचा घेतला पाहिजे या संभाजी राजांना 40 दिवस छळाने मारण्यात आले त्याच धर्मवीर राजांचा खरा इतिहास समाजासमोर आणण्याचे काम छावा चित्रपटाने केलेअसे गौरव उद्गार महाराजांनी या कीर्तन प्रसंगी केले
   गेल्या चाळीस वर्षात कार्यकर्त्यांनी मला भरभरून प्रतिसाद व प्रेम दिले त्यांच्या जिवावरच मी हे नेतृत्व करत आहे संताचे आशीर्वाद व मार्गदर्शन वारकरी संस्कारांचा आपल्यावर असलेला प्रभाव हा माझ्या राजकीय जीवनांत खूप कामी आला शेगाव पंढरपूर मार्ग व वाटर ग्रीड सारख्या महत्वकांक्षी योजना आपल्या राजकीय जीवनातील उपलब्धी असल्याचे व शरद पाटील भगवान देशमूख यांच्या सारखे निस्वार्थ कार्यकर्त्य सोबत असल्याचे प्रतिपादन बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितले

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात