Posts

Showing posts from April, 2025

डॉ. पुरुषोत्तम वायाळ, बालाजी ढोबळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Image
परतूर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण  छत्रपती संभाजीनगर येथील समर्थ सेवा समुहाच्या वतीने तालुक्यातील वाटूर येथील प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ व परतूर येथील पत्रकार बालाजी ढोबळे यांना ' मराठवाडा भूषण समर्थ गौरव ' हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.     जलतारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याबद्दल प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांना तर बालाजी ढोबळे यांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून सातत्याने प्रेरणादायी व लोकोपयोगी तसेच सकारात्मक वृत्तलेखनाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. =====================     दरवर्षी आमच्या संस्थेच्या वतीने उत्कृष्ट व समाजोपयोगी कामे करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाही महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण करण्या...

विमलबाई विभुते यांचे निधन

Image
परतुर: प्रतिनिधी कैलाश चव्हाण   शहरातील गावभागातील श्री नीलकंठ स्वामी मठ येथील श्रीमती विमलताई प्रभाकर विभुते वय 80 यांचे प्रताप काळाने निधन झाले त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली सुना नातवंड असा मोठा परिवार आहे त्या सिद्धलिंग स्वामी यांच्या मातोश्री होत्या श्री निळकंठ स्वामी मठ संस्थान परिसरात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी समाजातील सर्व भक्तगण नातलग आप्तस्वकीय व स्वामी परिवाराचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. गणेश चंद्रकांत गाडेकर (सिंहगड कॉलेज पुणे) यांना संगणकीय उपायोजन (कॉम्प्युटर अप्लिकेशन) या विषयामध्ये पी. एच. डी पदवी प्रदान..

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण सिंहगड कॉलेज पुणे येथे कार्यरत असलेले प्रा. गणेश चंद्रकांत गाडेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून संगणकीय उपायोजन (कॉम्प्युटर अप्लिकेशन) मध्ये "पुणे शहरातील व्यवस्थापन महाविद्यालयांच्या विशेष संदर्भात उच्च शिक्षणातील शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास" या विषयावर विद्यावाचस्पती (पी.एच.डी) पदवी प्रदान करण्यात आली. सदर संशोधन अभ्यासक्रमात त्यांना डॉ. यशवंत वायकर सर सहाय्यक प्राध्यापक - एमसीए व्यवस्थापनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या संशोधन काळामध्ये त्यांनी एकुण ०३ भारतीय पेटंट डिझाइन नोंदणी यशस्वीपणे डॉ. वायकर सरा समवेत केली आहे.  0२ स्कोपस इंडेक्स रिसर्च पेपर तसेच ०३ रिसर्च पेपर यूजीसी केअर जर्नलच्या संशोधन पत्रात यशस्वीरित्या प्रकाशित केली आहेत. त्यांच्या १२ वर्षाच्या एकुण शिक्षण क्षेत्रातील योगदाना मध्ये डॉ. गणेश गाडेकर यांनी NAAC समन्वयक,AICTE समन्वयक, DTE समन्वयक,AISHE समन्वयक, शिक्षण शुल्का समिती (FRA) समन्वयक,सावित...

राष्ट्रीय बंजारा परिषद मराठवाडा युवा विभागीय अध्यक्ष राजाराम पवार यांची निवड

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण जालना-तालुक्यातील खोडेपुरी येथील रहिवासी,सामाजिक कार्यकर्ते राजाराम भाऊ पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद मराठवाडा युवा विभागीय अध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष धर्मनेता किसन भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ राठोड ,तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भिकन भाऊ जाधव,पंडित भाऊ राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद महासचिव तसेच महाराष्ट्र प्रदेश महासचिव उमेश भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत युवा प्रदेश अध्यक्ष श्रीमंतराजे चव्हाण यांनी नियुक्तीपत्र व शाल व श्रीफळ देऊन नियुक्ती केली स्वागत करण्यात आले.यावेळी.. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंजेभाऊ चव्हाण, युवा प्रदेश सचिव श्रीकांत भाऊ राठोड, युवा जिल्हाध्यक्ष मांगीलाल चव्हाण, युवा कार्याध्यक्ष अजय पवार बरेच मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी अंजेभाऊ चव्हाण यांची निवड

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण   जालना-तालुक्यातील पाहेगाव येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते अंजेभाऊ चव्हाण यांची राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष धर्मनेता किसन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष भिकन जाधव,अँड.पंडित‌ राठोड,महाराष्ट्र प्रदेश महासचिव उमेश राठोड ,गोर कलावंत मराठवाडा अध्यक्ष, पंडित महाराज,यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळीयुवा प्रदेश सचिव श्रीकांत राठोड, युवा मराठवाडा अध्यक्ष राजाराम पवार, युवा कार्याध्यक्ष जालना अजय पवार, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष संदीप राठोड यावेळी अनेक राज्यातील पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहरादेवी धर्म पिठ येथे उपस्थित होते.

आरक्षण वर्गीकरण आमलबजावनी मोर्चाला मातंग समाजाचा उत्सुर्फ प्रतिसाद .!,अन्याय अत्याचाराच्या विरोधात उपजिल्हाधिकारी यांना मुलींच्या वतीने निवेदन सादर..!

Image
 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  आज दिनांक ८ एप्रिल रोजी परतूर शहरात सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती प्रवर्गात आरक्षण वर्गीकरण लागू करणे आणि मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. प्रामुख्याने मोर्च्यात अनुसूचित जाती प्रवर्गात आरक्षण वर्गीकरण झालेच पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीच्या पाट्या हातात घेत नागरिकांनी उत्सूर्फपने घोषणा दिल्या.क्रांतीगुरू लहुजी साळवे चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे शिस्तबद्धतेने मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. दरम्यान उपजिल्हाधिकारी यांना कुमारी माहेश्वरी आव्हाड,अश्विनी हिवाळे, रूपाली हिवाळे,आरती साबळे या मुलींच्या वतीने निवेदन देण्यात आले.         व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते गणपत भिसे,ॲड.विलास साबळे,ॲड राम चव्हाण, मारुती वाडेकर,राजू कसबे,संजू गायकवाड,भास्कर नाना शिंदे,शिवाजी भाऊ कांबळे,संतोष तुपसौंदर्य, रविकांत जगधने,शिवराज जाधव,रंगनाथ गजले, सुर...

योगी प्रधान यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार जाहीर

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण    पुणे येथे दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी पार पडणाऱ्या महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी जालन्या जिल्हातुन प्रथमच आपल्या परतुर तालुक्यातील योगी  प्रधान यांची महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली    त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, गौर गरिबांच्या साठी मदतीचा हात नेहमीच पुढे असतो व महाराष्ट्रामध्ये कुठेहि कोणत्याही ठिकाणी त्यांच मैत्रीच जाळ खूप मोठ्या प्रमाणात असल्याने होतकरू गौरगरिबांना नेहमीच मदतीचा हात त्यांच्या कडून भेटतो  अडचणीच्या काळात असो किंवा दवाखान्यात इमर्जन्सी काम असो त्यांचा मित्र परिवार नेहमी सर्वांच्या मदतीला  धावत येतत हे कार्य ते  मागील  बऱ्याच  बार्षा पासून करतात   त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पूर्वी हि त्यांना बरेच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे   त्यांच  या काार्यबदल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे 

मनुष्याला चिंतेने ग्रासले आहे त्याला चिंतनाची गरज,तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे काळाची गरज*,नूतनवर्षाच्या मुहुर्तावर श्री संत सेवालाल महाराज व जगदंबा देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न योगानंद बापूची उपस्थीतीत समारोप

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील    मनुष्याने स्वःतचे जीवन स्वाभीमानाने जगावे लाचारी ने जीवन जगणे म्हणजे स्वःत चा स्वाभीमान नसने स्वःत च्या कर्तृत्वावर विश्वास नसल्यासारखे आहे . प्रभू चरणी नतमस्तक होऊन स्वाभीमानाने जगेल तोच मनुष्य आयुष्यातील उद्दिष्ट साध्य करू शकतो मनुष्याने सपूर्ण संबलतेने येणार्या संकटांचा सामना करण्यासाठी मनुष्याने चांगल्या रस्त्याची निवड करावी दुष्कर्म पाहुन दुर राहुन चांगले सत्कर्माचे पाईक होणे गरजेचे आहे . संसारातील कर्तव्य या विषयावर बापूनी आज भाष्य केले आनंद चैतन्य बापू नी बेलोरा येथे समारोप प्रसंगी केले  मनुष्याला सध्या चिंतेने ग्रासले आहे त्या चितेला पासून त्याला दूर करण्यासाठी त्याला चितंनाची गरज आहे . मानव जन्म हा परत मिळणारा नाही म्हणून आपल्यात भेदभावाची भावना मनात निर्माण होणार नाही असा व्यवहार आपल्या वागण्यात बोलण्यात असणे गरजेचे आहे . आपली संस्कृती ही सनातन हिंदू धर्माची असुन तीला जपा ते आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे धर्मामुळेच आपली ओळख आहे . म्हणून जग सुद्धा आपल्या संस्कृतीचा आदर व स्वीकार करते तीच भावना आपल्या प्रत्येकाची असणे गरजे...

मनुष्याच्या आयुष्यात धर्म महत्वाचा तो जपणे गरजे,श्री गीता रामायण सत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प .पू . आनंद चैतन्य बापू यांचे बेलोरा येथे प्रतिपादन

तळणी प्रतिनिधी रवी पाटील    श्रद्धे शिवाय धर्म असू शकत नाही . धर्म हा आमचा प्राण आहे तो प्रत्येकानी जपलाच पाहिजे . धर्मा रक्षिती रक्षीताः धर्माच्या रक्षणाचे कर्तव्य हे प्रत्येकाने केले पाहिजे ते पण श्रद्धा ठेवून . धर्माची उत्पती ही श्रद्धे शिवाय होऊ शकत नाही श्रद्धा ही फक्त आहे म्हणून कसे जमेल आपल्याला तीचे प्राकटय करण विश्वासाने करावेच लागेल म्हणून श्रद्धा ही महत्वाची आहे . संसारिक मनुष्य खूप मेहनत करतो त्या मेहनतीतील थोडी जरी मेहनत आपण श्रद्धेने भगवत भक्ती साठी केली तर त्या भंगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन बेलोरा येथे चालू असलेल्या श्री गीता रामायण सत्संगाच्या दुसर्या दिवशी प्रतिपादीत केले श्रद्धा वीन धरम नही होई या रामायणातील चौपाई वर निरूपण केले संसारिक मनुष्याने भगवत भक्ती ही श्रद्धेने केली पाहिजे विश्वासाने केली पाहिजे . जसे की द्रोपदीने विश्वासाने संकटाच्या वेळी भगवंताला शरण जाऊन त्या भगवंताचे स्मरण केले व देव धावून आला . किती श्रद्धा किती विश्वास भगवंता प्रती असला म्हणजे तो आपल्या साठी धावून येईल . त्यासाठी स्वच्छ आणि निस्वार्थ भाव असला म्हणजे तो न...