डॉ. पुरुषोत्तम वायाळ, बालाजी ढोबळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर



परतूर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
छत्रपती संभाजीनगर येथील समर्थ सेवा समुहाच्या वतीने तालुक्यातील वाटूर येथील प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ व परतूर येथील पत्रकार बालाजी ढोबळे यांना ' मराठवाडा भूषण समर्थ गौरव ' हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
    जलतारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याबद्दल प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांना तर बालाजी ढोबळे यांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून सातत्याने प्रेरणादायी व लोकोपयोगी तसेच सकारात्मक वृत्तलेखनाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

=====================
    दरवर्षी आमच्या संस्थेच्या वतीने उत्कृष्ट व समाजोपयोगी कामे करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाही महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. - दत्ता ठुबे, अध्यक्ष, समर्थ सेवा समूह, छत्रपती संभाजीनगर.
=====================

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात