ऊस्वद येथील पूर्णा नदी पात्रात तहसीलदाराची कारवाई तीन टेम्पो ताब्यात,तीन दिवसात चार टेम्पोवर कारवाई,दुचाकीवर येऊन केली कारवाई
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
पूर्णा नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उत्खननावर गेल्या तीन दिवसांपासून कारवायांचे सञ मंठा तहसिलदार सोनाली जोंधळे याच्यासह पथकाकडून चालूच आहे . टाकळखोपा येथे ३० ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आल्यानंतर बुधवारी एक टेम्पो पकडल्यानंतर आज सकाळी शुक्रवारी सकाळी पाच वाजता उस्वद येथील पूर्णा नदी पात्रात तीन टेम्पो पकडून मंठा येथील शासकीय गोडामात लावण्यात आले . रात्री पासून गस्तीवर असलेल्या तहसीलदार यांना वाळू चोर नदी पात्रात उतरल्याची माहिती मिळाली होती उस्वद येथे कारवाई करायची म्हणजे महसुल प्रशासनासमोर एक प्रकारचे आव्हाहन आहे .
काही दिवसांपूर्वी या ठिकाणी महसुल पथकाला शिवीगाळ करून नदीपात्रातून हाकलून दिले होते . उस्वद येथील वाळू चोरावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत 
शासन मान्य लिलावाला होत असलेला विलंब वाळू चोरांच्या पथ्यावर पडत आहे . कानडी येथील प्रस्तावित वाळू घाटातून उत्खनन सुरू आहे . गेल्या वर्षभरात एक कोटी तीस लाख रुपयांचा महसुल अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून करण्यात आला आहे . आज झालेल्या कारवाईतून साडेचार लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळणार आहे . आजची कारवाई ही अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली . कारण महसुल पथकातील काही पंपचर कर्मचार्याची वाळू चोरावर मेहरबानी असल्यामुळे मोजकेच कर्मचारी घेऊन भल्या पहाटे ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली अशीच कारवाई वाघाळा टाकळखोपा कानडी व अन्य ठिकाणी महसुल प्रशासनाकडून अपेक्षीत आहे .
वाळू चोरावर सतत कारवाया चालू आहेत उस्वद व अन्य ठिकाणच्या उत्खननाची माहिती प्राप्त आहे वर्षभरात सवा कोटी रुपयाचा महसुल शासनास मिळाला आहे उस्वद येथे कारवाया संदर्भात अनेक अडचणी आहे
सोनाल जोधळे तहसीलदार मंठा