उघड्यावर मास विक्री करणारे विक्रेते तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणऱ्या वर परतूर पोलीसांची कार्यवाई
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
पोलीस ठाणे परतुर हद्दीतील उघड्यावर मास विक्री करणारे विक्रेते तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेते आणि रस्त्यावर वाहने उभे करून रहदारीस अडथळा निर्माण करणारे वाहन चालक यांच्यावर परतुर पोलिसांनी केली कारवाई.
काल रोजी जालना शहरात घडलेल्या एका पाच वर्षीय मुलीचा मोकाट कुत्र्यांनी जावा घेतल्याने मृत्यू झाला. या संबंधाने अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलीस ठाणे हद्दीतील ज्या ठिकाणी उघड्यावर मास विक्री करणारे विक्रेते व मासाचे रॉ मटेरियल उघड्या जागेवर टाकून त्याला कुत्रे व इतर प्राणी खाऊन सदरची घटना झाली आहे या अनुषंगाने उघड्यावर मास विक्री करणारे व मासाचे रॉ मटेरियल उघड्यावर टाकणारे मास विक्रेते यांच्यावर व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे फळ व भाजीपाला विक्रेते तसेच रस्त्यावर वाहने उभी करून रहदारीस अडथळा निर्माण करणारे वाहन चालक या संबंधित व्यक्तीवर कारवाई करून खटले दाखल करण्यात आले आहेत.
1)उघड्यावर मास विक्री करणाऱ्या 10 व्यक्तीवर कार्यवाही करण्यात आली
2) रस्त्यावर भाजीपाला व फळे विक्री करणाऱ्या 12 व्यक्तीवर कारवाई करण्यात आली
3) रस्त्यावर वाहने उभे करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या 2 वाहन चालकावर कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई
मा. श्री अजय कुमार बंसल साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. श्री. आयुष नोपनी साहेब , अप्पर पोलिस अधीक्षक साहेब, मा. श्री. दादाहरी केशव चौरे साहेब, SDPO परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.टी सुरवसे, पोलिस निरीक्षक, पो स्टे. परतूर, पोलीस उपनिरीक्षक मुंडे ,सफौ. खंदारे, पोहेका/ रामदास फुपाटे , पोहेका/ अशोक गाडवे, पोका/सॅम्युएल गायकवाड, पोका/दशरथ गोफनवाढ, पोका/ वंदन पवार, पोका/ राम पारवे, पोका/सुनील इलग , यांनी केली आहे.