राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी अर्शद बागवान
मुंबई । प्रतिनिधी नरेश अन्ना
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या आदेशाने व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी अर्शद रज्जाक बागवान यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी युवक संघटना वाढीसाठी व सर्व ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे
यावेळी, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आमदार अरविंद चव्हाण, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस कय्युम खान यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी, ध्येय- धोरणे ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याबरोबरच, युवकांचे विधायक विचारांचे संघटन उभारुन पक्ष मजबुत करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे त्यांनी नियुक्ती दरमयान नवनिर्वाचीत प्रदेश सचिव अर्शद रज्जाक बागवान यांनी बोलतांना व्यक्त केले. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विस्तारासाठी दिलेले योगदान, तसेच युवकांचे संघटन पाहता ही जबाबदारी देवून त्यांचा पक्षाने सन्मान केला आहे. राज्यात युवकांचे संघटन अधिक मजबुत करण्यासाठी आपण येत्या काळात अथक परिश्रम घेवून ही जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडण्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला. अंगी युवा नेतृत्व गुण असलेल्या अर्शद रज्जाक बागवान यांनी युवकाचे मोठे संघटन उभे केले आहे. अर्शद बागवान यांना कुठलिही राजकीय पार्श्वभुमी नसतांना त्यांनी स्वकर्तृत्वावर पक्षात आपली वेगळी आणि स्वच्छ प्रतिमा तयार करून आणी त्यांचे असलेले पक्षासाठी योगदान पाहुन त्यांच्यावर पक्षाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सोपविली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण , जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अमर पाटील, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खय्युम खान, जालना तालुका अध्यक्ष संतोष ढेंगळे, सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे , गणेश भुतेकर, संभाजी भुतेकर,लखन तुरे,आकाश शिंदे यांनी नवनिर्वाचीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव अर्शद बागवान यांचे अभिनंदन करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.