वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा (पूर्व) अध्यक्षपदी रामप्रसाद थोरात (सर) यांची निवड

परतूर प्रतीनीधी संतोष शर्मा
 वंचित बहुजन आघाडीच्या जालना जिल्हा (पूर्व)च्या अध्यक्षपदी परतुरचे वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी श्री रामप्रसाद किसनराव थोरात यांची निवड वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार व प्राध्यापक किसन चव्हाण सर (महासचिव वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश) यांच्या पत्रानवे दिनांक 20.10.2025 रोजी निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  रामप्रसाद थोरात यांनी परतुर मतदारसंघातून निवडणूक लढवत तीस हजार मते मिळवत दमदार लढत दिली. 
  परतुर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून तसेच आष्टी ग्रामपंचायत चे सरपंच म्हणून ही त्यांनी काम केलेली आहे. परतूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनंतर प्रमुख विरोधी उमेदवार म्हणून रामप्रसाद थोरात यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या निवडून मुळे मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचा प्रवास चांगल्या पद्धतीचा होईल. त्यांच्यासोबत महासचिव म्हणून डॉक्टर किशोर त्रिभुवन, उपाध्यक्षपदी परमेश्वर खरात, भारत उघडे, कोषाध्यक्ष म्हणून सतीश खरात आणि सचिव म्हणून जमीर शेख यांची सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे. अध्यक्ष श्री रामप्रसाद थोरात व सर्व कार्यकारिणीचे सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात