धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीकरता दिलेले बलिदान वाया जाऊन देणार नाही-प्रकाश सोनसळे (अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य)
बीड(प्रतिनिधी):- मांजरसुंबा येथिल धनगर समाजातील आनंद न्यायमूर्ती कोकाटे वय-38 यांने धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी लढा अनेक वर्षापासून धनगर समाजाने मोर्चे,आंदोलन, रस्ता रोको, आमरण उपोषणे करूनही या धनगर समाजाला राज्य सरकार हे जाणीवपूर्वक आरक्षण अंमलबजावणी करत नसल्याकारणामुळे आपल्या मूलाबाळांना आरक्षण नसल्यामुळे कसे होईल या नैराश्यातून गेली दहा ते पंधरा दिवस डोक्यामध्ये आरक्षणाचा विचार येत होता आणि एक दिवस असा विचार आला की आनंद कोकाटे या तरुणाने धनगर एसटी आरक्षणासाठी आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या शेडच्या अँगलला दोरी बांधून पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
आंनद कोकाटे यांच्या पश्चात आई,भाऊ,पत्नी,दोन मुली,मुलगा असा परिवार आहे.आंनद यांच्या आत्महत्येने जिल्हाभर,पंचक्रोशीतून,परिसरातुन, समाजातुन सर्वत्र हळहळ व दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच धनगर समाजाचे नेते प्रकाश सोनसळे यांनी मांजरसुंबा येथे कोकाटे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन कै.आनंद कोकाटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व कोकाटे परिवाराला असे आश्वासन दिले कै.आनंद कोकाटे यांनी धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्वतःचे बलिदान दिले हे बलिदान आम्ही वाया जाऊन देणार नाही असे कोकाटे कुटुंब्यास आश्वासन दिले व हा लढा येथेच थांबणार नाही आम्ही धनगर एसटी आरक्षणाचा लढा हा चालूच ठेवणार आहोत. आणि कोकाटे कुटुंबाच्या पाठीमागे धनगर समाज पूर्णपणे उभा राहील या कुटुंबाला न्याय देईल.
यावेळी किशोर भावले,सूर्यकांतजी कोकाटे, दिगंबरजी चादर, बाबू सोनसळे, दीपक कोकाटे,मन्मथ, शिवराम, चंद्रसेन कोकाटे, अभिजीत भोंडवे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment