माजीसैनिक प्रभाकर ढोबळे यांचे निधन
परतूर प्रतीनीधी संतोष शर्मा
शहरातील रहिवाशी तथा माजीसैनिक प्रभाकर श्यामराव ढोबळे यांचे मंगळवारी (दि. 28) पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले, दोन विवाहीत मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजीसैनिकांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्काराला समाजातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार बालाजी ढोबळे यांचे ते बंधू होते.
Comments
Post a Comment