योगेश डोणे हे पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी ठरताहेत प्रबळ दावेदार...!


परतूर  प्रतिनिधी संतोष शर्मा
 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावपातळीवर राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार तयारीच्या मोडमध्ये दिसत आहेत. 
अशात योगेश गणेशराव डोणे यांनी वरफळ गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. योगेश डोणे हे नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम अग्रेसर राहुन समस्यांचे निराकारण करणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्षे नागरीकांसाठी निष्ठेने काम केले असून, दिलेला वेळ, दाखविलेली निष्ठा आणि जनसंपर्क याच त्यांच्या उमेदवरीच्या प्रमुख ताकदी ठरतील, स्थानिकांचा विश्वास आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा कल आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता योगेश गणेशराव डोणे यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत आहे. असा योगेश डोणे यांनी युवा मल्हार सेनेच्या माध्यमातुन अनेक सामाजीक समस्या सोडवून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच या भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, शेतकरी सुविधा, सार्वजनिक बांधकामे अशा अनेक योजना प्रत्यक्षपणे राबविल्या असुन राबवल्या त्यांनी राजकारणापेक्षा सामाजिक कार्य केल्याने या भागात सामाजिक सलोखा आणि एकोपा राखत विकासाचा वेग वाढविला आहे. राजकारणासोबत सामाजिक क्षेत्रातही योगेश गणेशराव डोणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी युवकांना प्रोत्साहित केले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविला आणि गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला. यामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार आणि लोकसंपर्काचे जाळे निर्माण केले आहे. योगेश डोणे हे निष्ठावान कार्यकर्ते असून, पक्ष
संघटनेत सातत्याने सक्रिय भूमिका निभावली आहे. आता पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी पुढाकार घेण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांच्या अनुभव,
नेतृत्वावर असलेला विश्वास आणि स्थानिक जनतेचा पाठिंबा पाहता वरफळ गणातील निवडणूक रंगतदार होणार, हे निश्चित दिसत आहे. वरफळ गणातील ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू असून, योगेश गणेशराव डोणे हे विकासाचा चेहरा
म्हणून पुढे यावेत, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात