नगर पालिकेची स्वयंखर्चाने केली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्त,पाण्याच्या गंभीर समस्येवर सामाजिक कार्यकर्ते इज्जरान कुरैशीनी साधला तोडगा
परतूर प्रतीनीधी संतोष शर्मा
येथील इंदिरा नगर परिसरात गेली अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत होती. नगर पालिकेकडून यावर कोणताही ठोस उपाय होत नसल्याने, नागरिकांचे हाल होत होते. मात्र, याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते इजरान कुरेशी यांनी पुढाकार घेत, स्वतःच्या खर्चानुसार खराब झालेली पाईपलाईन खराब झाली होती. या पाईपलाईन मध्ये मोठ मोठे दगड जमा झालेले होते. इजरान कुरेशी यांनी तात्काळ याची दखल घेत एक उत्कृष्ट व आदर्श उपक्रम राबवला आहे. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर झाली असून, नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान इंदिरा नगर भागात जुनी आणि जीर्ण झालेली पाईपलाईन होती, ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणीगळती होत असे आणि लोकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. कित्येकदा लोकांना पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते. नगर पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही, निधीअभावी किंवा इतर कारणांमुळे या कामाकडे दुर्लक्ष झाले होते.
सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार....!
या गंभीर समस्येची दखल सामाजिक कार्यकर्ते इजरान कुरेशी यांनी घेतली. नगर पालिकेकडून होणारी दिरंगाई लक्षात घेऊन, त्यांनी नागरिकांच्या हितासाठी स्वतः पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वखर्चाने पाईपलाईन दुरुस्त केली.
आम्हाला घरातच मुबलक पाणी मिळत आहे....!
या उपक्रमामुळे इंदिरा नगर परिसरामधील नागरिकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे. "गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पाण्याची समस्या झेलत होतो. सामाजिक कार्यकर्ते इजरान कुरेशी यांच्यामुळे आज आम्हाला घरातच मुबलक पाणी मिळत आहे. त्यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत," असे मत स्थानिक नागरिक शेख फारुख लाल यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment