Posts

Showing posts from November, 2025

परतूर येथे बी.रघुनाथ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

Image
परतूर प्रतीनीधी  संतोष शर्मा   येथील आयुर्वेद प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा तिसरा बी.रघुनाथ पुरस्कार सुप्रसिद्ध कथाकार राम निकम यांना जाहीर झाला असून बुधवारी दि. 5 नाव्हे.2025 रोजी  परतूर शहरात पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते तिसरा बी.रघुनाथ पुरस्कार राम निकम यांना प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांची उपस्थिती असणार आहे. सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा.छबुराब भांडवलकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य असणारे डॉ. पृथ्वीराज तौर यांना वाड्मयीन योगदानासाठी रशियातील मॉस्को मध्ये वर्ल्ड्स रायटर्स असोशियन तर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. पृथ्वीराज ...