शिक्षकाचे स्थान हे देव्हार्यातील देवासारखे असले पाहिजे,निवृत्त शिक्षक अशोक कदम यांच्या निरोप समांरभ कार्यक्रमात डॉ पुरुषोतम भापकर यांचे प्रतिपादन
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
ऊस्वद देवठाणा येथील निवृत्त शिक्षक अशोक कदम यांचा आज उस्वद येथील व्यकेश्वर मंदिरात सेवागौरव समारंभा आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण आयुक्त पुरुषोतम भापकर बोलत होते .शिक्षकाने शिस्त क्षमता आणि कर्तव्यदक्षता या तीन गोष्टींनी परिपूर्ण असणे गरजेचे आहे शिक्षक हा समाज व्यवस्थेतील एक प्रमुख कणा असून त्याच्यावर येणाऱ्या पिढीवर संस्कार करण्याचे काम शिक्षकांचे आहे शिक्षकाने समाजात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे ही काळाची गरज आहे आपल्या मुलावर संस्कार त्यांची बौद्धिक क्षमता शैक्षणिक क्षेत्रात असणारे त्यांचे योगदान यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्नशील असणे खूप गरजेचे आहे सध्याच्या या धकाधकीच्या युगात आपण आपल्या शरीर संपदेकडे दुर्लक्ष करत असल्यानेअनेक व्याधींनीग्रस्त होत आहे आपल्या पाल्यांना व्यायामाची सवय लावणे सध्या गरजेचे आहे
महाराष्ट्रात शिक्षण आयुक्त म्हणून काम करत असताना अडीच कोटी मुलं सात लाखाहून शिक्षक व एक लाखभर शाळा यांचे नेतृत्व करण्याची संधी मला शिक्षण आयुक्त असताना मिळाली त्या संधीचे सोने करत शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उच्च स्थानी नेण्यासाठी मोठी मेहनत केली
शिक्षकाचे आयुष्य हे समाजातील शोषित वंचिताला न्याय देण्यासाठी असणे गरजेचे आहे शिक्षकाची समाजातील भूमिका ही शिक्षण देण्याबरोबरच सामाजिक समरसतेची असणे गरजेचे आहे . ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व अनेक गड किल्ले जिंकून स्वतःच राज्य प्रस्थापित केले वीर सावरकरांसारखे क्रांतिकारक या देशाने बघितले त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असणे आजच्या पिढीसाठी खूप गरजेचे आहे व्यसनाधीन ते पासून तरुणांनी दूर राहणे गरजेचे आहे त्यासाठी घरातील वातावरण हे संस्कारित असणे गरजेचे आहे .मी आयुक्त असताना मला या भागात येण्याची संधी मिळाली नाही याची खंत मला नेहमीच जाणवेल ग्रामीण भागात आजही अनेक गोष्टी करण्यासारखे आहेत याचा विचार आजच्या तरुण पिढीने करणे खूप गरजेचे आहे ग्रामीण भागातही खूप मोठी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी आज अनेक प्लॅटफॉर्म तयार आहेत त्याचा वापर तरुणांनी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी या सेवा गौरव समारंभ प्रसंगी केले
तसेच यावेळी सेवानिवृत्त शिक्षक अशोक कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले एकाच गावात 35 ते 37 वर्षे नोकरी करणं सोपं नाही गावकऱ्यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास व त्यांच्याबद्दलची आपुलकी यामुळे जास्तीत जास्त शिक्षण सेवा उस्वद येथेच झाल्याने गावकऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कदम सरांच्या विरुद्ध कधीच कुठली तक्रार ग्रामस्थांनी केली नसल्यानेग्रामस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले या ओळी परिसरातील तीन ते चार गावातील अनेक मान्यवर कदम सर यांचा सत्कार प्रसंगी उपस्थित होते श्री कदम सर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार याप्रसंगी विशद केले
याप्रसंगी गोविंद चव्हाण गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मंठा माननीय दत्ता क्षीरसागर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बदनापूर डी एस खरात केंद्रप्रमुख उसवत खंदारे आर जी मुख्याध्यापक देवठाणा उसवत की जी राठोड शिक्षण विस्तार अधिकारी मंठा यांची उपस्थिती होती
अशोक कदम यांचा सर्व पंचक्रोशीत उत्तम शिक्षक परिचित आहे सर्वांशी आपलेपणाने बोलणे त्यांचा विनम्र स्वभावच सर्वांना आपली स्वीकारण्याची वृत्ती परिसरातील दांडगा संपर्क त्यामुळे त्यांचाआदर मोठा होता उस्वद ग्रामस्थांनीही शाळेच्या विकासासाठी कधी सरांना नाही म्हणली नाही जड अंतकरणाने संबंध गावकऱ्यांनी त्यांना निरोप दिला
Comments
Post a Comment