लोणीकर पिता-पुत्रांचे कट्टर समर्थक नामदेव गोरे नगर परिषदेची निवडणुक लढविण्यास इच्छुक,आ.बबनराव लोणीकरांनी संधी दिल्यास सामाजिक कार्याच्या जिवावर नामदेव गोरे खेचुन आणु शकतात विजयश्री
परतुर प्रतीनिधी संतोष शर्मा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावपातळीवर राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार तयारीच्या मुडमध्ये दिसत आहेत. अशात युवक नेते तथा आ. बबनराव लोणीकर व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांचे कट्टर समर्थक नामदेव गोरे यांनी परतुर नगर परिषद प्रभाग सहा मधुन निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.
नामदेव गोरे हे गेल्या अनेक वर्षापासुन राजकारणात सक्रिय युवक नेते असुन नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम अग्रेसर राहुन समस्यांचे निराकारण करणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्षे नागरीकांसाठी निष्ठेने काम केले असून, दिलेला वेळ दाखविलेली निष्ठा आणि जनसंपर्क याच त्यांच्या उमेदवारीच्या प्रमुख ताकदी ठरतील, असा या प्रभागातील स्थानिकांचा विश्वास आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा कल आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पक्षाने व आ. बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांनी त्यांना संधी दिल्यास ते सामाजिक कार्याच्या जिवावर विजयश्री खेचुन आणणार यात तिळमात्र शंका नाही.
Comments
Post a Comment