अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र संघटकपदी विकासकुमार बागडी
जालना प्रतिनिधी समाधान खरात
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघच्या महाराष्ट्र संघटकपदी जालना येथील जालना समाचारचे संपादक विकासकुमार बागडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांची ही नियुक्ती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय संघटक कैलास देशमुख यांनी एका नियुक्तीपत्रकाव्दारे केली आहे.
विकासकुमार बागडी हे मागील 28 वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात आहे. ते पत्रकारांचे विविध प्रश्न व हितासाठी काम करीत असून, त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना महाराष्ट्र संघटकपदाची जवाबदारी देण्यात आली आहे. आगामी काळात पत्रकारांची एकजुट करण्यासह त्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही नुतन महाराष्ट्र संघटक विकासकुमार बागडी यांनी दिली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसूफखान पठाण, केंद्रीय नियोजन समिती अध्यक्ष सुरेश सवळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, राष्ट्रीय महासचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश महिला मंच सरचिटणीस कांचनताई मुरके , तसेच जिल्ह्याचे जेष्ठ पत्रकार, संपादक, जिल्हा प्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ता आदिंनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment