ज्ञानोबा तुकोबा शिवबा शिवाय या महाराष्ट्राचा इतिहास कधीच पूर्ण होणार नाही. शिव व्याख्याते अविनाश पाटील
तळणी प्रतिनिधी रवी पाटील आपल्या महाराष्ट्राला मोठी संत परंपरा असून त्या संत परंपरेच्या त्यागानेच त्यांच्या कष्टाने त्यांच्या समर्पण भावानेच आपण आज वाटचाल करत आहोत या वाटचालीमध्ये अनेक वीर पुरुषांचाही मोठा सहभाग त्यांचे बलिदान असल्यामुळेच आपण आज सप्ताह साजरे करतो आहे .या महाराष्ट्रात माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय या महाराष्ट्राचा इतिहास कधीच पूर्ण होऊ शकत नाही असे प्रतिपादन शिवव्याख्याते अविनाश महाराज पाटील यांनी तळणी येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात केले जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसूनी देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंदले जागे या अभंगावर निरूपण केले जगद्गुरु तुकाराम महाराज यांना गाथा निर्माण करताना अनेक संकटांना सामोरे जावं लागलं त्यासाठी अपार कष्ट तुकोबांना झेलावे लागले परंतु तो गाथा आपल्याला सहज मिळाला आहे त्याचा उपयोग आपण केला पाहिजे देहू परिसरातील डोंगरावर तुकोबांनी ज्ञानसाधना करून त्याच साधनेच्या जोरावर वैकुंठा गमन केले मनुष्याच्या जीवनात निस्वार्थ ...