अभेदाची भक्तीच देवाला प्रिय; भेद त्यागून परमार्थ करा – दशरथ अंभोरे महाराजांचा


तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
परमार्थ करायचा असेल तर तो अभेदाच्या भावनेतूनच झाला पाहिजे. भेद धारण करून केलेली भक्ती देवाला प्रिय ठरत नाही. *अभेदाची भक्ती करावी, तीच भक्ती देवाला प्रिय आहे*, असा रोखठोक व विचारप्रवर्तक उपदेश दशरथ महाराज अभोरे यांनी तळणी येथे केला.
हरीच्या भक्त नाही भय चिंता या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण केले परमार्थिक साधना करत असताना अनेक अडचणी येत असतात परंतु मनाभावातून केलेली साधना ही त्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचते फक्त त्या साधनेमध्ये अहंकार गर्व नसला पाहिजे आदर व ही नम्रपने केलेली साधनांचा स्वीकार देऊ नक्की करत असतो 
श्री संत सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी कीर्तनसेवेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आधार घेत परमार्थाचा खरा अर्थ उलगडून सांगितला.
महाराज म्हणाले की, आज अनेक जण परमार्थ करत असतानाही अंतःकरणात भेद बाळगतात. संसारामध्ये अभेद पाहिला जातो आणि परमार्थामध्ये भेद केला जातो, ही मोठी चूक आहे. *खरं तर संसारात भेद हवा आणि परमार्थात अभेद हवा*, हे जगद्गुरु तुकोबारायांनी ओळखले होते. दुःख भेदातून येते, तर परमार्थातील सुख अभेदातून प्राप्त होते.
परमार्थ हा स्वतःच्या बुद्धीने करण्याचा विषय नसून त्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शास्त्रात सांगितलेला श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ व कृपाळू असा सद्गुरू लाभल्याशिवाय परमार्थ साध्य होत नाही. हे तिन्ही गुण जगद्गुरु तुकोबारायांमध्ये होते, असेही त्यांनी सांगितले.
जगद्गुरु तुकोबारायांनी आपली परमार्थिक सत्ता सोडून व्यावहारिक जगात अवतार घेतला. त्यांचे बालपण, संसारातील जबाबदाऱ्या, दुःख, संकटे ही सर्वसामान्य माणसासारखीच होती. संसारात दुःखाव्यतिरिक्त काहीच नाही, हे ओळखून त्यांनी परमात्म्याचे भजन केले आणि प्रत्यक्ष विठ्ठलाचे साक्षात्कार घेतले, असे महाराजांनी सांगितले.
भक्तिमार्गालाच मनुष्याच्या आयुष्यात सर्वोच्च स्थान असले पाहिजे. मात्र आजची भक्ती स्वार्थी झाली असून संकट आले कीच देव आठवतो, ही भक्ती भगवंताला प्रिय नाही. सातत्याने, निःस्वार्थ भावनेने केलेली भक्तीच मोक्षाकडे नेते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

 तरुण पिढी व्यसनाच्या वाटेवर; संस्कारांची गरज

आजच्या तरुण पिढीत व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून व्यसनांना फॅशन समजले जात आहे. त्यामुळे तरुण स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत. मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. तरुणांनी धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महाराणा प्रताप यांसारख्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन मार्गक्रमित करावे, असे आवाहनही दशरथ महाराजांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात