निस्वार्थ केलेला परमार्थ हाच उच्च कोटीचा आनंद देतो– विलास महाराज गेजगे
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
परमार्थ करत असताना आनंद होत असेल तर आपण परमार्थ करत आहोत ही भावना निर्माण आपोआप होते काही जण म्हणतील परमार्थात आनंद कसा तर प्रत्येक मनुष्य परमार्थ करत नाही प्रत्येक मनुष्य माळकरी नाही प्रत्येक मनुष्य गंध टिळा बुक्का लावत नाही .माळ घालण्यासाठी परमार्थ करण्यासाठी प्रवृत्त होण्यासाठी या जन्मात मनुष्याला अनंत जन्माची पुण्याई निश्चित लागते तर त्या मनुष्याकडून निस्वार्थ परमार्थ घडू शकतो व तो परमार्थ करत असताना त्या मनुष्याला उच्च कोटीचा आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन विलास महाराज गेजगे यांनी तळणी येथे केले यंदाचे या सप्ताहाचे हे विसावे वर्ष असून श्री संत सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्याकडून या भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आता भय नाही असे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची या अभंगावर महाराजांनी निरूपण केले
परमार्थ हा प्रत्येकाला न घडण्याचे कारण म्हणजे त्याच्या मुळात तील पाप वृत्तीचा दोष परमार्थिक वृत्ती साठी पूर्वीचे संचितही खूप महत्त्वाचे आहे त्याशिवाय या कलियुगात मनुष्याला साधक व परमार्थ कृती सहजासहजी निर्माण होणे या वातावरणात तरी शक्य नाही देवाचा प्रसाद सुद्धा मनुष्याला भाग्यनच मिळतो तो ग्रहण करायचा झाला तरी नशिबात असल्याशिवाय मिळत नाही परमार्थिक साधना करत असताना कुठलाही स्वार्थ मनात ठेवला तर ती साधना देवाला अप्रियच आहे आपल्या साधुसंतांची साधना ही जगाच्या कल्याणासाठी होती म्हणून त्यांचा उद्धार झाला परंतु आपण करत असलेली साधना ही स्वार्थी साधना असून ती भगवंताला प्रिय नाही
आजकाल भक्तीचे थोतांड सुरू आहे स्वतःवर संकट आले की मनुष्य देवाचा धावा करू लागतो परंतु आपल्या साधनेत सातत्य असणे गरजेचे आहे रोज आपल्या नित्यनेमानेत्या भगवंताला आपण स्मरण केले पाहिजे एक एक दिवस आपला काळ जवळ येत आहे याचा विचार मनुष्याने ठेवणे गरजेचे आहे
साधू हा समाजाच्या हितासाठी स्वतःला साधनेच्या जोरावर सिद्ध करतो म्हणून त्याला देवतोप्राप्त होते एका जन्मात शस्त्र पाठ झाले .तर अहंकार आहे एका जन्मात कला चांगली आली तर अभिमान आहेपरंतु श्री संत ज्ञानोबाराय श्री संत तुकोबाराय नाथ महाराज यांनी ही साधना अनेक जन्मी केली परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची स्वार्थी भावना निर्माण झाली नाही कारण त्यांनी स्वतःसाठी न काय करता समाजासाठी केले धर्मासाठी केले म्हणून ते आजपर्यंत अमर झाली आहेत .म्हणून निस्वार्थ केलेली भक्तीची पांडुरंग परमात्म्याला प्रिय असते
अंगात आलेला देव राहत नाही परंतु चित्तात शिरलेला देव निघत नाही तुकोबारायांच्या चित्तात देव शिरला होता म्हणून वैकुंठात घेऊन जाण्यासाठी स्वतः देव आले .कारण तुकोबारायांची साधना उच्च कोटीची होती निस्वार्थ होती एकाग्र होती
आज आपल्या गोठ्यात गायीचे अस्तित्व संपत चालली आहे तिला सगळ्यांनी जपा आई-वडिलांची सेवा करा प्रत्येकाने एक गाय पाळा गायीच्या अस्तित्वामुळेच आज आपले अस्तित्व टिकून आहे परंतु दोन पैशाच्या लोभावर आपण तीची सेवा करत नाही गाईची सेवा ही परमात्म्याची सेवा आहे त्यासाठी तिला सांभाळा हा संदेश महाराजांनी शेवटी दिला
Comments
Post a Comment